फोटो सौजन्य: सोशल मीडिया
लंडन: सध्या टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स चे मालक इलॉन मस्क चर्चेत आहेत. एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर दुसरीकडे मस्क यांना मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने इलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बहिष्कार घातला आहे. त्यांनी एक्स न वापरण्याचा निर्ण घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान इलॉन मस्क यांनी त्यांना समर्थन दर्शवले होते. त्यानंतर ट्रम्प यांच्या विजयानंतर इलॉन मस्क यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. यानंतर इलॉन मस्क यांच्या एक्सवर एकतर्फी आरोप होऊ लागले आहेत. द गार्डियन ने आरोप केला आहे की, एक्सवर आता सर्व गोष्टी नकारात्मक होऊ लागल्या आहे.
द गार्डियनने एक्सवर केला हा आरोप
द गार्डियनचे एक्सवर 27 दशलक्षहू अधिक फॉलोवर्स आहेत. मात्र द गार्डियन आता कोणतीही पोस्ट करणार नाही. यामुळे द गार्डियन चा एक मोठा भाग वाचकांपर्यंत पोहोचणार नाही. द गार्डियनच्या या निर्णयामुळे एक्सला एक महत्त्वपूर्ण वापरकर्ता गमवावा लागेल. द गार्डियनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये वृत्तपत्राने म्हटले आहे की, एक्सवर असलेल्या आक्षेपार्ह आणि नकारात्मक गोष्टींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
एक्स अतिउजव्या विचारसरणीचे बनत चालले आहे
निवेदनात म्हटले आहे की, एक्स अतिउजव्या विचारसरणीचे बनत चालले आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांबद्दल एक्सवर होणाऱ्या एकतर्फी कव्हरेजमुळे द गार्डियन च्या नेतृत्वाला असे वाटले की, त्यांना आता या प्लॅटफॉर्मपासून दूर राहणे योग्य ठरेल. द गार्डियन ने स्पष्ट केले की, त्यांच्या पत्रकारांना एक्स वापरण्यावर कोणतेही बंधन नाही. पत्रकार वृत्तसंकलनासाठी एक्स वापरू शकतील. याशिवाय इतर युजर्सही द गार्डियन चे लेख शेअर करू शकतात. मात्र, द गार्डियन च्या अधिकृत अकाउंटवरून आता कोणत्याही प्रकारचे लेख किंवा पोस्ट टाकले जाणार नाहीत.
एक्सवर गंभीर परिणाम होऊ शकतो
हा निर्णय अगदी काळजीपूर्वक विचार करून घेण्यात आला आहे. त्यांचे मत आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नकारात्मकता पसरवणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. या अशा निर्णयामुळे एक्सची प्रतिमा आणि युजर्सचा विश्वास कमी होऊ शकतो. इलॉन मस्क यांच्यासाठी हा निर्णय निश्चितच धक्कादायक ठरू शकतो. हा निर्णय इलॉन मस्क यांच्या प्लॅटफॉर्मला गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषत: अशा वेळी जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर विश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.