Shubanshu Shukla's return journey begins, Will reach Earth after 23 hours of journey from ISS
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मिशन ‘अॅक्सिओम-४’यशस्वी झाले आहे. आता शुभांशू शुक्ला आपल्या पूर्ण टीमसह पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले आहे. आज १४ जुलै रोजी दुपारी ४.४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन घरी परण्यासाठी त्यांनी उड्डाण केले. सुमारे २३ तांसाच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता परततील. शुभांशू शुक्ला १४ जुलै रोजी दुपारी ४.४५ वाजता आयएसएसच्या हार्मनी मॉड्यूलमधून अंतराळयान अनडॉक करण्यात आले. १४ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर हे अंतराळयान स्प्लॅशडाऊन होईल.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याची महिती दिली. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये, “शुभांशू तुमचे स्वागत आहे” असे म्हटले. तसेच त्यांनी सांगितले की. अॅक्सिओम ४ यशस्वीरित्या अनडॉक झाले आहे. सध्या या मिशनच्या टीमचा परतीचा प्रवास सुरु आहे. त्यांनी म्हटले की, “संपूर्ण देश तुमच्या घरी येण्याची वाट पाहत आहे.”
याच वेळी शुभांशू शुक्ला यांनी पृथ्वीवर परतण्यापूर्वी आपल्या देशवासियांना एक खास संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले की, “आता आपण लवकरच पृथ्वीवर भेटू.” या मोहिमेत नासाचे अंतराळवीर आणि अक्सिओम मिशनचे कमांडर पेही व्हिटसन, भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला, मिशन तज्ज्ञ पोलंडचे स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश आहे. या चारही अंतराळवारींचा पारंपारिक निरोप समारंभात सन्मान करण्यात आला आहे.
केंद्रीय विज्ञान एवं प्रौद्योगिकी तथा अंतरिक्ष राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह ने ट्वीट किया, “शुभांशु, आपका स्वागत है। पूरा देश आपके घर वापस आने का इंतजार कर रहा है… क्योंकि आप #Axiom4 को सफलतापूर्वक अनडॉक करने के बाद अपनी वापसी यात्रा शुरू कर रहे हैं।” pic.twitter.com/WQYpNecaHh — ANI_HindiNews (@AHindinews) July 14, 2025