Shutdown in France:
Shutdown in France: अमेरिकेतील शटडाऊनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही घटना ताजी असतानच गुरुवारपासून (२ ऑक्टोबर) फ्रान्समध्येही शटडाऊन करण्यात आले आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिससह २०० हून अधिक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरून सरकारी धोरणांचा निषेध करत होते. सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये कपात करण्याऐवजी श्रीमंतांवर कर वाढवण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी
पॅरिसमधील प्लेस डी’इटली येथून आंदोलकांनी आपला मोर्चा सुरू केला. या मोर्चात कामगार, निवृत्त आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. हा मोर्चा इतका भव्य होता की, काही तासांनंतर पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवर देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. संपाचा स्मारकाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याच कारण स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले.
फ्रान्सच्या प्रमुख संघटनांनी हा संप पुकारला आहे. सरकारला माजी पंतप्रधानांच्या अर्थसंकल्पीय योजना रद्द करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले. तसेच, सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सरकारी धोरणांमुळे फ्रान्समधील सामान्य जनतेची, विशेषतः कमी आणि मध्यम उत्पन्न गटांची आर्थिक परिस्थिती आणखीणच बिकट होत चालली आहे. पण त्याऐवजी श्रीमंतांवर जास्त कर लावण्याची मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल
फ्रान्सचे नवनिर्वाचित पंतप्रधान, सेबॅस्टिन लेकोर्नू, यांनी अद्याप त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची घोषणा केलेली नाही. तसेच, सविस्तर अर्थसंकल्पीय रूपरेषा सादर केलेली नाही. येत्या काही दिवसांत सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल आणि वर्षाच्या अखेरीस संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या तरी, जनता आणि संघटना खर्च कपातीबाबत तडजोड करण्यास तयार नसल्याने या आंदोलनामुळे लेकोर्नूच्या नवीन सरकारवर अतिरिक्त दबाव आला आहे.
४४ अब्ज युरोच्या नियोजित बजेट कपातीचा निर्णय घेतल्यामुळे फ्रान्सचे फ्रँकोइस बायरो यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. गुरुवारी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांची संख्या मागील निदर्शनांपेक्षा कमी होती. नॅन्टेसमधील निदर्शनात सहभागी डोमिनिक मेयनियर यांनी सांगितले, “आपल्यात फारसे लोक नसले तरी आपण लढा सुरू ठेवला पाहिजे. प्रत्येक वेळी आपण एक दिवस गमावतो. तसेच, डिजॉन, मेट्झ, पॉइटियर्स आणि माँटपेलियरसह फ्रान्समधील २४० हून अधिक ठिकाणी निदर्शने होणार आहेत. सुव्यवस्था राखण्यासाठी ७६,००० पोलिस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
फ्रान्समध्ये, सरकार पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक सेवांवरील खर्च कमी करण्याची योजना आखत आहे. शिक्षण, आरोग्य आणि इतर सार्वजनिक सेवांमध्ये कपात करू नये अशी संघटना आणि लोक मागणी करत आहेत. सर्वसामान्यांवरील भार कमी करण्यासाठी श्रीमंतांवर जास्त कर लादले जावेत अशी त्यांची इच्छा आहे. निदर्शकांची अशीही इच्छा आहे की सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय मागे घ्यावा. याचा अर्थ ते असा संदेश देत आहेत की त्यांना सरकारी कपातीपेक्षा सामाजिक सेवांमध्ये अधिक गुंतवणूक हवी आहे.