भारताला चक्रीवादळाचा धोका (फोटो- istockphoto)
ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाचा इशारा
देशभरातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट
चक्रीवादळाच्या धोक्याने यंत्रणा अलर्ट मोडवर
गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने देशभरात कहर केला आहे. अनेक राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभगाने पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाचे सावट कायम असल्याचे पाहायला मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाळा पोषक हवामान तयार झाले आहे. या पट्ट्याचे रूपांतर आता चक्रीवादळमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ मोठ्या वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे.
India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
समोर आलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ किनारपट्टीवरील ओडीशा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळचा वेग तशी 70 ते 75 कीमी प्रतीतास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. नागरिकांना सवधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज उत्तर प्रदेशमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले. मात्र आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस उत्तराखंड राज्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.