Since inauguration Trump has been taking bold decisions aggressively targeting China
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजवणारे विधान केले आहे. त्यांनी पनामा कालव्याच्या नियंत्रणावरून चीनवर निशाणा साधत अमेरिकेच्या पुनःस्थापनेसाठी मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर जगभरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये
शपथविधीनंतर ट्रम्प प्रशासन आक्रमक धोरण राबवत आहे. त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर मोठ्या प्रमाणात कर लादला होता. आता त्यांनी पनामा कालव्याच्या नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित करून चीनवर दबाव वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, पनामा कालवा मूळतः अमेरिकेने बांधला होता आणि चीनने कराराचे उल्लंघन करत त्यावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे अमेरिका हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे.
“पनामा कालवा परत घेऊ किंवा काहीतरी मोठे घडेल!”
ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अमेरिका कोणत्याही परिस्थितीत पनामा कालव्याचे नियंत्रण परत घेईल. चीनने चुकीच्या पद्धतीने कालवा घेतला असून आम्ही हे सहन करणार नाही. जर आम्हाला कालवा परत मिळाला नाही, तर काहीतरी खूप मोठे आणि शक्तिशाली घडणार आहे.”या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर उपस्थित करू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कोण आहे ती महिला पायलट? जिचे हेलिकॉप्टर अमेरिकेच्या विमानाला धडकून कोसळले, अपघातात 67 जणांचा मृत्यू
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची थेट धमकी
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीही पनामावर दबाव टाकत चीनचे नियंत्रण त्वरित संपवावे, अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास अमेरिका कडक पावले उचलेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राउल मुलिनो यांनी मात्र शांततेच्या चर्चेचा प्रस्ताव दिला असून, आम्ही कोणत्याही दबावाला घाबरत नाही, असे स्पष्ट केले आहे.
पनामा कालव्याचा ऐतिहासिक प्रवास
पनामा कालवा हा 82 किलोमीटर लांबीचा आहे आणि तो अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागराला जोडतो. अमेरिकेने 1914 मध्ये या कालव्याचे उद्घाटन केले होते. 1977 मध्ये अमेरिका आणि पनामामध्ये करार झाला, ज्याअंतर्गत संयुक्त नियंत्रण ठेवण्याचे ठरले. मात्र, 1999 मध्ये संपूर्ण कालवा पनामाच्या हाती देण्यात आला. त्यानंतर चीनने पनामासोबत मोठे व्यापारी संबंध प्रस्थापित केले आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून त्याचा प्रभाव वाढवला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्थलांतर धोरणांवर वादंग, सेलेना गोमेझचा अश्रू ढाळणारा व्हिडिओ झाला व्हायरल; व्हाईट हाऊसने दिले ‘असे’ चोख प्रतिउत्तर
अमेरिका-चीनमध्ये तणाव वाढणार?
चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका नाराज आहे आणि आता ट्रम्प प्रशासनाने पनामा कालव्याच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण तापले आहे. पुढील काळात अमेरिका आणि चीनमध्ये या मुद्द्यावर मोठा संघर्ष उभा राहू शकतो.
यावर पनामाची भूमिका काय असेल आणि अमेरिका कोणत्या टप्प्यावर निर्णय घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.