Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIPRI Report 2026:भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश; रशियाचा ‘भ्रमनिरास’ अन् फ्रान्सची ‘एन्ट्री

२०२१-२०२५ या कालावधीत भारत आता मोठ्या शस्त्रास्त्रांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार असलेल्या फ्रान्सचा सर्वात मोठा खरेदीदार बनला आहे. त्याच कालावधीत भारत रशियाचा सर्वात मोठा खरेदीदार (४८%) राहिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 09, 2026 | 12:13 PM
sipri report 2026 india second largest arms buyer russia france shift marathi

sipri report 2026 india second largest arms buyer russia france shift marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताची मोठी झेप
  • रशियाला फटका, फ्रान्सचा फायदा
  • जागतिक शस्त्रास्त्रांची बाजारपेठ

 India Largest Arms Exporter SIPRI Report 2026 : स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने २०२६ चा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला असून, यामध्ये जागतिक भू-राजकारणातील बदलत्या समीकरणांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भारताने आपल्या संरक्षण धोरणात आमूलाग्र बदल केला असून, आता भारत रशियासारख्या पारंपारिक मित्राकडून अंतर राखत पाश्चात्य तंत्रज्ञानाकडे, विशेषतः फ्रान्सकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताचा नवा अवतार: जगातील दुसरा सर्वात मोठा खरेदीदार

काही वर्षांपूर्वीपर्यंत भारत शस्त्रास्त्र आयातीत अव्वल असायचा, मात्र २०२१-२०२५ या कालावधीत युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेन हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार (९.७%) बनला आहे. भारत आता दुसऱ्या स्थानावर असून जगातील एकूण शस्त्रास्त्रांच्या व्यापारात भारताचा मोठा वाटा आहे. भारताने आपली संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी केवळ एका देशावर अवलंबून न राहण्याचे धोरण (Diversification) स्वीकारले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO

रशियाबद्दल ‘भ्रमनिरास’ आणि फ्रान्सशी वाढती जवळीक

दशकानुदशके रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार राहिला आहे. आजही भारताच्या एकूण आयातीपैकी ४८% वाटा रशियाचा आहे, परंतु हा आकडा पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घटला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाला असून, रशियन तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याचाच फायदा फ्रान्सला होताना दिसत आहे. भारत आता आपल्या एकूण शस्त्रास्त्रांपैकी २४% शस्त्रास्त्रे फ्रान्सकडून खरेदी करत आहे. राफेल विमाने आणि स्कॉर्पिन पाणबुड्यांसारख्या संरक्षण करारांमुळे फ्रान्स आता भारताचा दुसरा सर्वात मोठा आणि विश्वासार्ह भागीदार बनला आहे. भारताचा हा कल स्पष्ट करतो की, नवी दिल्ली आता पाश्चात्य देशांच्या प्रगत तंत्रज्ञानाला अधिक पसंती देत आहे.

According to the SIPRI fact sheet , India is the second largest importer of Arms after ukraine . ATMANIRBHAR BHARAT 💞💞 pic.twitter.com/LUiRgk93P6 — Panther🇮🇳 (@Panther7112) March 9, 2026

credit – social media and Twitter

पाकिस्तान आणि चीनचे घातक समीकरण

SIPRI अहवालात भारताच्या शेजारील देशांबाबतही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तान आता आपल्या ८०% पेक्षा जास्त शस्त्रास्त्रांसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. चीन आणि पाकिस्तानमधील ही वाढती लष्करी युती भारतासाठी ‘टू-फ्रंट वॉर’ (दोन आघाड्यांवरील युद्ध) चे संकट निर्माण करत आहे. चीन हा रशियाचाही दुसरा सर्वात मोठा खरेदीदार (१३%) असल्याने आशियातील लष्करी संतुलन वेगाने बदलत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: युद्धाच्या गदारोळात अमेरिकेची संसाधन शिकार! इराण युद्धामागे फक्त ‘डर्टी पॉलिटिक्स’; ट्रम्प यांच्या सहकाऱ्याची कबुली

युरोपमध्ये युद्धाची भीती आणि अमेरिकेची चांदी

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये पहिल्यांदाच शस्त्रास्त्रांची एवढी मोठी भूक पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत युरोपीय देशांनी आपली शस्त्रास्त्र आयात तब्बल २१०% ने वाढवली आहे. रशियाच्या आक्रमकतेमुळे पोलंड, जर्मनी आणि नॉर्वे यांसारख्या देशांनी आपल्या संरक्षणावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेचा फायदा सर्वाधिक झाला आहे. जगातील ४२% शस्त्रास्त्रे एकटा अमेरिका विकत आहे. गेल्या ५ वर्षात अमेरिकेच्या निर्यातीत २७% वाढ झाली आहे. रशियाचे जुने ग्राहक आता अमेरिकन बनावटीची ‘हवाई संरक्षण प्रणाली’ आणि ‘टँक्स’ खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश कोणता आहे?

    Ans: २०२६ च्या SIPRI अहवालानुसार, युक्रेन हा जगातील पहिल्या क्रमांकाचा तर भारत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे.

  • Que: भारत रशियाकडून किती टक्के शस्त्रे खरेदी करतो?

    Ans: भारत अजूनही ४८% शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे, परंतु हे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.

  • Que: जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश कोणता?

    Ans: अमेरिका (USA) ४२% जागतिक वाट्यासह जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश आहे.

Web Title: Sipri report 2026 india second largest arms buyer russia france shift marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Defence Ministery
  • PM Narendra Modi
  • World War 3

संबंधित बातम्या

Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…
1

Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…

3.5 किमी एअरस्ट्रीपसह 12 जिल्ह्यांना जोडणारा Ganga Expressway ; दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडलाही मिळणार वेग
2

3.5 किमी एअरस्ट्रीपसह 12 जिल्ह्यांना जोडणारा Ganga Expressway ; दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडलाही मिळणार वेग

“महिला आरक्षणाचे ध्येय मी पूर्ण करणारच”; वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द
3

“महिला आरक्षणाचे ध्येय मी पूर्ण करणारच”; वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द

“ED, CBI आणि… हे मोदींचे ३ पक्के मित्र”; अरविंद केजरीवाल यांचा पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींवर प्रहार
4

“ED, CBI आणि… हे मोदींचे ३ पक्के मित्र”; अरविंद केजरीवाल यांचा पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींवर प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.