Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spain Train Crash : स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर हिंसक आंदोलन; पंतप्रधानांसह परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Spain Train Crash : स्पेनमध्ये हायस्पीड रेल्वे अपघातात 68 जणांचा मृत्यू आणि 180 हून अधिक जण जखमी झाल्याच्या वृत्तानंतर माद्रिदमध्ये हिंसक आंदोलन झाले. आंदोलकांनी पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 29, 2026 | 06:59 PM
Spain Train Crash : स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर हिंसक आंदोलन; पंतप्रधानांसह परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Spain Train Crash : स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर हिंसक आंदोलन; पंतप्रधानांसह परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे सुरक्षेवरून सरकारविरोधात संताप
  • पोलिसांशी झटापट; अश्रुधुराचा वापर
  • 68 जणांचा मृत्यू, 180 हून अधिक जखमी
 

स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या (Spain Train Crash) भीषण अपघातात 68 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर सरकारविरोधातील संताप उफाळून आला आहे. माद्रिदमध्ये बुधवारी रात्री शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या आणि फटाके फेकले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि जमावाला पांगवले.

स्पॅनिश वृत्तसंस्था ईएफईच्या वृत्तानुसार, माद्रिदमध्ये एक हजारांहून अधिक नागरिकांनी सरकारविरोधी आंदोलन केले. उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रेल्वे सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि परिवहन मंत्री ऑस्कर पुएंते यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही आंदोलकांनी परिवहन मंत्र्यांविरोधात तीव्र घोषणाबाजीही केली.

पोलिसांशी झटापट; अश्रुधुराचा वापर

या आंदोलनाचे आयोजन दक्षिणपंथी ‘फालांज’ पक्ष आणि ‘रेवुएल्टा’ सारख्या संघटनांनी केले होते. तसेच ‘वॉक्स’शी संबंधित ‘सोलिदारिदाद’ या संघटनेने स्वतंत्र आंदोलन केले.

काही आंदोलकांनी पोलिसांचे सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तणाव वाढला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचे गोळे सोडले. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने रिकाम्या बाटल्या आणि फटाके फेकले. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले.

Armenia Parliament : ‘त्या’ एका वक्तव्याने अर्मेनियाची संसद पेटली; खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO जोरदार VIRAL

रेल्वे अपघातात 68 जणांचा मृत्यू

माद्रिदच्या दक्षिणेला उर्डा शहराजवळ बुधवारी सकाळी हा भीषण रेल्वे अपघात झाला. स्पेनच्या सरकारी प्रसारक आरटीव्हीईच्या वृत्तानुसार, सरकारी रेल्वे कंपनी रेनफेची एक रेल्वेगाडी खासगी कंपनी इर्योच्या रुळांवर उभ्या असलेल्या गाडीला धडकली. या दुर्घटनेत 68 जणांचा मृत्यू झाला, तर 180 हून अधिक जण जखमी झाले.

हायस्पीड रेल्वेगाड्या ताशी 200 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावत असल्याने या अपघाताची तीव्रता मोठी होती. प्राथमिक वृत्तांनुसार, रेल्वे सुरक्षा यंत्रणेत बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर नियंत्रण केंद्राने एका गाडीला पुन्हा प्रवास सुरू करण्याची परवानगी दिल्याने दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल.

Israel Election: इस्रायलमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; नेतान्याहूंना सत्तेवरून हटवण्यात अरब पक्ष ठरतील का किंगमेकर?

स्पेनमध्ये यापूर्वी जानेवारी महिन्यात अडामूजजवळ रेल्वे अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 46 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ताज्या अपघातानंतर रेल्वे सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताची जबाबदारी निश्चित करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्पेनमध्ये रेल्वे अपघात कुठे झाला?

    Ans: माद्रिदच्या दक्षिणेला उर्डा शहराजवळ बुधवारी सकाळी रेल्वे अपघात झाला.

  • Que: या रेल्वे अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: अपघातात 68 जणांचा मृत्यू झाला, तर 180 हून अधिक जण जखमी झाले.

  • Que: स्पेनमध्ये नागरिकांनी आंदोलन का केले?

    Ans: रेल्वे अपघातानंतर रेल्वे सुरक्षेतील संभाव्य त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले.

Web Title: Spain train crash protests pm transport minister resignation rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • prime minister
  • Train Accident NEws

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.