Israel Election: इस्रायलमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; नेतान्याहूंना सत्तेवरून हटवण्यात अरब पक्ष ठरतील का किंगमेकर? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इस्रायलमधील नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची उजव्या विचारसरणीची आघाडी असो किंवा विरोधी पक्ष, यापैकी कोणालाही इस्रायली संसदेत (क्नेसेट) सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जादुई ६१ बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. या त्रिशंकू परिस्थितीमुळे इस्रायलमधील अरब-बहुल पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असून, ते आगामी सरकारचे ‘किंगमेकर’ म्हणून समोर आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, नेतान्याहू यांच्या आघाडीला ५३ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर विरोधी पक्षांच्या आघाडीला ४८ जागा मिळाल्या आहेत. मात्र, या संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे ते अरब पक्षांच्या जोरदार कामगिरीमुळे. ‘जॉइंट लिस्ट’ आणि ‘रा’आम पार्टी’ मिळून तब्बल १९ जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलच्या १२० सदस्यीय संसदेत अरब पक्षांची ही आजवरची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.
अरब पक्षांच्या या अभूतपूर्व यशामागे प्रामुख्याने अरब मतदारांचा वाढलेला प्रचंड सहभाग कारणीभूत आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुमारे ७७.७% वर पोहोचली, जी १९९९ नंतरची सर्वाधिक उच्चांकी टक्केवारी आहे. काही विशिष्ट अरबबहुल शहरांमध्ये तर हा आकडा ८५ टक्क्यांच्या घरात गेला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan BIG-B Initiative : काय आहे हा ‘BIG-B’ प्लॅन? बांगलादेशात भारताच्या प्रवेशासाठी जपान करतोय जोरदार तयारी
सध्याचे सरकार आणि त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या धोरणांवद्दल अरब समाजात तीव्र असंतोष होता. संघटित गुन्हेगारी, राहत्या घरांची तीव्र कमतरता, सामाजिक भेदभाव आणि सरकारी निधीचा अभाव यांसारख्या गंभीर समस्यांना हा समुदाय वर्षानुवर्षे तोंड देत आहे. याच उपेक्षेमुळे आणि बदलाच्या तीव्र इच्छेमुळे अरब नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावली, ज्याचा थेट फायदा अरब राजकीय पक्षांना मिळाला.
जरी अरब पक्ष नेतान्याहूंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची ताकद ठरू शकत असले, तरी प्रत्यक्षात हा मार्ग अजिबात सोपा नाही. जॉइंट लिस्ट आणि रा’आम पार्टी या दोन्ही पक्षांची राजकीय रणनीती वेगवेगळी आहे. जॉइंट लिस्टने सामान्यतः ज्यूंच्या नेतृत्वाखालील सरकारांमध्ये थेट सामील होणे टाळले आहे. मात्र, ते नेतान्याहूंना सत्तेवरून हटवण्यासाठी संसदेत बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असू शकतात.
दुसरीकडे, मन्सूर अब्बास यांच्या नेतृत्वाखालील ‘रा’आम पार्टी’ने यापूर्वीच युती सरकारमध्ये सहभागी होत ऐतिहासिक पाऊल उचलले होते. अब्बास यांनी संकेत दिले आहेत की, जर विरोधी आघाडीने त्यांच्या मागण्या मान्य केल्या, तर ते सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू शकतात. परंतु, विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोरही अंतर्गत राजकीय अडचणी आहेत. काही ज्यू विरोधी नेत्यांचा अरब पक्षांसोबत काम करण्यास तीव्र विरोध आहे, ज्यामुळे युती स्थापन करणे एका काटेरी मुकुटासारखे बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Election: ‘अरब पक्षांनी वोटचोरी..’; पोलिसांच्या ‘अशा’ निवेदनामुळे इस्रायली अध्यक्ष नेतान्याहूंच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह
आता इस्रायलचे राष्ट्रपती सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून एका प्रमुख नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी २८ दिवसांची मुदत देतील. जर पहिला नेता अपयशी ठरला, तर दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाईल. सध्याच्या स्थितीत सरकार स्थापनेचे तीन मार्ग शक्य आहेत पहिला म्हणजे विरोधी पक्ष आणि अरब पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करणे, दुसरा म्हणजे राष्ट्रीय एकता सरकारची स्थापना, आणि तिसरा मार्ग म्हणजे वाटाघाटी अपयशी ठरल्यास पुन्हा निवडणुका घेणे. परिस्थिती पाहता, अरब पक्षांच्या भूमिकेवरच इस्रायलचे आगामी राजकारण आणि पंतप्रधानपदाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
Ans: नाही, इस्रायलच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सरकार स्थापनेसाठी आवश्यक ६१ बहुमताचा आकडा गाता आलेला नाही.
Ans: आंशिक निकालानुसार, जॉइंट लिस्ट आणि रा'आम पार्टी मिळून एकूण १९ जागा जिंकण्याचा अंदाज आहे, जी त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
Ans: इस्रायलच्या १२० सदस्यीय संसद (क्नेसेट) मध्ये बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ जागांची आवश्यकता असते.






