Stuck NASA astronauts Sunita Williams and Butch Wilmore returning to Earth on SpaceX capsule
नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर पृथ्वीवर लवकरच परतणार आहेत. दोघेही गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइन कॅप्सूलमधून आठ दिवसांच्या मोहीमेवर अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, बोईंग अंतराळयानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांचा हा आठ दिवसांचा प्रवास लांबवणीवर पडला. दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर ट्रम्प यांनी सोपवली होती. अखेर 15 मार्च रोजी स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट ISS वर जाण्यासाठी निघाले आणि 16 मार्च रोजी पोहोचले. आता हे स्पेस क्राफ्ट दोन्ही अंतराळवीर आणि क्र-9 च्या टीम मेंमबर्सला घेऊन परत येणार आहे.
लॅंडिग ठरु शकते आव्हानात्मक
मात्र, फाल्कन-9 अंतराळयानाचे लॅंडिग करणे अत्यंत कठीण आहे. लॅंडिगदरम्यान एक छोटी चूकही महागात पडू शकते. यामुळे संपूर्ण अंतराळयान जळून खाख होऊ शकते. ते कसे आपण जाणून घेऊयात. जेव्हा एखादे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणाच प्रवेश करते यावेळी त्याचा वेग कमी होतो. या दरम्यान अंतराळयानाचा कोनात थोडाही बदल झाल्यास यामुळे घर्षणात बदल होईल आणि अंतराळयान आगीच्या गोळ्यात रुपांतरित होईल.
बाहेरील घर्षणामुळे यानातील तापमानात वाढ
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते याला ‘री-एंट्री’ म्हटले जाते. हा सर्वात आव्हानात्मक टप्पा असतो. यान पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना वेग कमी होतो आणि वातावरणाशी घर्षण वाढते. यामुळे अंतराळयानाचे आतील तापमान 1500 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. यामुळे यान जळून खाक होऊल शकते. याचा यानातील अंतराळवीरांना देखील मोठा धोका आहे.
अशी असेल लॅंडिग प्रक्रिया
सुनिता विल्यम्स यांचा पगार
नासाचे अंतराळवीर सरकारी कर्मचारी असून त्यांना केवळ 4 डॉलर्स म्हणजेच सुमारे 347 रुपये प्रतिदिनि इन्सिडेन्ट भत्ता देण्यात येतो. म्हणजेचे मिशनच्या 287 दिवसांचे सुनीता विल्यम्स यांना केवळ 1,148 जॉलर म्हणजे बारतीय रुपयांत अंदाजे 1 लाख रुपये पगार मिळणार.
सुनिता विल्यम्स यांची संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात लोकर्पिय अंतराळवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती सुमारे 5 दशलक्ष डॉलर आहे. भारतीय चलानामध्ये जवळपास 43 कोटी रुपयांपेक्षा अधिक विल्यम्स यांची संपत्ती आहे.