Sunita Williams will get overtime payment Donald Trump says I will pay from my pocket if needed
वॉशिंग्टन: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतरावीर आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर 9 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परतले. स्पेसएक्सच्या अंतराळयानातून त्यांना पृथ्वीवर परत आणण्यात आले. दरम्यान त्यांच्या पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या कामाचा ओव्हरटाईम मिळणार का यावर चर्चा सुरु होती. याच दरम्यान दोन्ही अंतराळवीरांना ओव्हरटाईम पेमेंट मिळणार नाही, याबद्दवल माहित नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
खर तरं सुनिता विल्यम्स यांचा हा प्रवास फक्त आठ दिवसांचा होता मात्र तो 286 दिवसांमध्ये बदलला. सुनिता विल्यम्स यांना 286 दिवसांसाठी प्रतिदिन पाच डॉलर्स मिळणार होते, मात्र ते अद्याप देण्यात आले नाहीत. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी म्हटले की, “मला हे माहिती नव्हते आणि कोणी सांगितले नाही, पण गरज पडल्यास मी माझ्या खिशातून पैसे देईन. ही रक्कम फार छोटी आहे, दोन्ही अंतराळवीरांना झालेल्या त्रासाच्या पुढे काहीच नाही.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, विल्यम्स, विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना पृथ्वीवर सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी मी एलॉन मस्क यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली. सर्व अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून परतले आहेत.
दोघेही गेल्या वर्षी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइन कॅप्सूलमधून आठ दिवसांच्या मोहीमेवर अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, बोईंग अंतराळयानाच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांचा हा आठ दिवसांचा प्रवास लांबवणीवर पडला. दोन्ही अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी स्पेसएक्सवर ट्रम्प यांनी सोपवली होती. अखेर 15 मार्च रोजी स्पेसएक्सचे फाल्कन 9 रॉकेट ISS वर जाण्यासाठी निघाले आणि 16 मार्च रोजी पोहोचले. आता हे स्पेस क्राफ्ट दोन्ही अंतराळवीर आणि क्र-9 च्या टीम मेंमबर्सला घेऊन परत येणार आहे.
तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यावर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर तसेच सोडल्याचा आरोपही केला होता.
दरम्यान ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लावरील हल्ल्याचाही उल्लेख केला. त्यांनी या हल्ल्यांची तुलना 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल येथे झालेल्या दंगलीशी केला आहे. सध्या हे प्रकरण जोरदार चर्चेत आहे.