दिलेला शब्द फिरवला! रशियाचा यूक्रेनच्या 'या' महत्त्वाच्या शहरावर मोठा ड्रोन हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: सध्या रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु आहे. दरम्यान 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती. मात्र याच दरम्यान रशियाने यूक्रेनच्या ओडेसा बंदर शहरावर शुक्रवारी (21 मार्च) रात्रभर ड्रोन हल्ले केले आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने यूक्रेनच्या उर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती. मात्र या हल्ल्यामुळे हवाई हल्ले सुरु ठेवण्याचा मॉस्कोचा हेतू अधोरेखित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ओडेसा बंदरावरी एक उंच इमारत, एक शॉपिंग सेंटर आणि अनेक पायाभूत सूविधांवर हल्ला केला आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा चेकचे अध्यक्ष पेट्र पॉवेल शहरात होते. अधिकाऱ्यांनी म्हटले की, ओडेसा बंदर शहरावर मोठा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, त्यांनी म्हटले की, “पुन्हा एकदा रशियाला शांतता नको असल्याचे या हल्ल्यांमधून दिसून येते.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 18 मार्च रोजी फोनवरुन दीर्घ संवाद साधाला. पुतिन यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्यानंतर 30 दिवस यूक्रेनच्या कोणत्याही उर्जा प्रकल्पांवर हल्ला न करण्यास सहमती दर्शवली. मीडिया रिपोर्टनुसार, तसेच 30 दिवसांच्या कालवधी दरम्यान यूक्रेन-रशियामधील कैद्यांची देवाण-घेवाण करण्यावरही पुतिन यांनी सहमती दर्शवली. मात्र, रशिया यूक्रेनियन शहरांवर आणि लष्करी तळांवर हल्ले करत राहू शकतो. तसेच रशियाने या दविसांत यूक्रेनने लष्करी हालचाली थांबवण्याची मागणी केली.
त्यानंतर बुधवारी (19 मार्च) यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही रशिया-यूक्रेन युद्धावर एक तास संवाद साधला.दरम्यान झेलेन्स्की यांनी म्हटले की, यूक्रेनने युद्ध संपवण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. यूक्रेन उर्जा आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचे समर्थन करतो. आम्ही युद्धबंदीसाठी तयार आहोत. यूक्रेनच्या सैन्याला युद्धबंदी लागू करण्याचे आणि इतर तांत्रिक समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्वय राखण्यासाठी यूक्रेन आणि अमेरिका सौदी अरेबियात भेटीसाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.