फोटो सौजन्य सोशल मीडिया
यातील ९ विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्येकडील एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये (ADIZ) प्रवेश केला. त्याचवेळी चीनच्या नौदलाची ७ जहाजे आणि एक अधिकृत जहाजही तैवानच्या आसपास आढळून आले. त्यामुळे तैवानच्या सुरक्षाव्यवस्थेने सतर्कता वाढवली आहे.
तैवानच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर सकाळी ६ वाजल्यापासून ७ ऑक्टोबर सकाळी ६ वाजेपर्यंत चीनच्या १४ लष्करी विमानांची हालचाल नोंदवण्यात आली. यातील ९ विमानांनी तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्येकडील ADIZ मध्ये प्रवेश केला.
चीनकडून तैवानभोवती सातत्याने अशा प्रकारच्या लष्करी गस्त घातल्या जात असल्याने तैवानसाठी ही परिस्थिती आता नवी राहिलेली नाही. मात्र, विमानांची संख्या आणि त्यांची विविध दिशांमधील हालचाल यामुळे तणाव कायम आहे.
Germany News : माजी गुप्तचर प्रमुखाला अटक; हेरगिरी आणि देशद्रोहाच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप!
चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैवाननेही आपली लष्करी यंत्रणा सक्रिय केली. तैवानच्या हवाई दलातील गस्तीची विमाने, नौदलाची जहाजे तसेच किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यात आली.
चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात असून कोणत्याही संभाव्य धोक्याला उत्तर देण्यासाठी तैवानची संरक्षण यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही काळापासून चीनकडून तैवानच्या आसपास विमान आणि नौदलाच्या माध्यमातून दबाव वाढवण्याची रणनीती दिसून येत आहे.
West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
तैवानला चीन आपला अविभाज्य भाग मानतो आणि बेटावर नियंत्रण मिळवण्यासाठी गरज पडल्यास बळाचा वापर करण्याचा पर्यायही बीजिंगने कायम खुला ठेवला आहे. दुसरीकडे, तैवान स्वतःचे सरकार, सैन्य आणि स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था चालवतो.
त्यामुळे तैवानचा प्रश्न हा आशिया-पॅसिफिकमधील सर्वात संवेदनशील मुद्द्यांपैकी एक मानला जातो. चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे अमेरिका, जपान आणि इतर देशांचेही या भागातील घडामोडींवर लक्ष आहे. सध्या चीनकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू झाल्याचे संकेत नसले तरी तैवानभोवती वाढलेली लष्करी उपस्थिती भविष्यातील तणावाची शक्यता कायम ठेवत आहे.






