Taiwan Earthquake 5.6 magnitude earthquake jolts Taiwan
तैपेई: एक मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा तैवान भूकंपाने हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरवारी सकाळी (30 जानेवारी) रोजी 5.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणतेही गंभीर नुकसान झालेलेल नाही. मात्र, तरीही अलीकडच्या काही काळात तैवानमधील भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येत्या काळातही भूकंपाचे जोरदार धक्के बसण्याची शक्यत असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना सुरक्षेची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहे.
सेंट्रल वेदर एजन्सी आणि युएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूंकपाचा केंद्रबिंदू चियायी काउंटीच्या दापू टाउनशिपमध्ये १० किलोमीटर खोल होता. दापूमद्ये अनेक लहान भूकंपाचे झटके जाणवले आहेत. तसेच, cमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, मात्र कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. पहिल्या धक्क्यानंतर दापूमध्ये डझनभर लहान झटके बसले. यापूर्वी 21 जानेवारी रोजी देखील 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला होता.
तैवानमध्ये भूकंपामुळे नुकसान
भूकंपामुळे तैवानमध्ये अनेक जुन्या इमारती कोसळल्या आहेत. यामुळे दोन गाड्यांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर काऊंटीमध्ये झालेल्या भूकंपामुळे दरड कोसळली आणि राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. याच वेळ नान्क्सी जिल्ह्यातील (तैनान) पर्वतीय भागात भूस्खलन झाले, यामुळे धूळ आणि वाळू डोंगरांवरून खाली पडली.
आणखी भूकंप होण्याची शक्यता
भूगर्भशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये अलीकडे भूकंपाच्या वाढत्या हालचालींमुळे येत्या काही दिवसांत आणखी झटके बसू शकतात. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, तैवान पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर स्थित असून हा भाग भूकंपीय क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे चिलीपासून न्यूझीलंडपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवतात.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
सध्या तैवानच्या सरकारने लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आणि भूकंप टाळण्यासाठी नागरिकांना सुरक्षित ठिकाणांची माहिती ठेवण्यास सांगितली आहे. सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
भूकंप का होतात?
मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत. ज्या फिरत राहतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो. भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे ऊर्जा सोडली जाते. या ठिकाणी भूकंपाची कंपने अधिक तीव्र असतात. कंपनाची वारंवारता जसजशी वाढते तसतसा त्याचा प्रभाव कमी होतो.