Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

pak-afg war : ड्युरंड रेषेचा वणवा राजधानीपर्यंत! अफगाणिस्तानच्या ड्रोनने थेट पाकिस्तानचे हमजा मिलिटरी सेंटर उडवले

Taliban Drone Attack : अफगाणिस्तानने इस्लामाबादच्या हमजा मिलिटरी सेंटरवर ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर डुरंड रेषेवर तणाव वाढत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 14, 2026 | 01:30 PM
taliban drone attack on islamabad hamza military center destroyed pakistan alert marathi

taliban drone attack on islamabad hamza military center destroyed pakistan alert marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • इस्लामाबादवर ड्रोन हल्ला
  • पाकिस्तानात मोठी जीवितहानी
  • बदल्याची कारवाई

भारत आणि जगाचे लक्ष सध्या मध्यपूर्वेकडे असतानाच, आपल्या शेजारील देशांमध्ये युद्धाची भीषण ठिणगी पडली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद (Afghanistan-Pakistan Conflict) आता केवळ ड्युरंड रेषेपुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट राजधानीपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हवाई दलाने (Taliban Air Force) इस्लामाबादच्या फैजाबाद भागातील मोक्याच्या ‘हमजा’ लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्लामाबाद स्फोटांच्या आवाजाने हादरून गेले असून, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

हमजा मिलिटरी सेंटरवर अचूक निशाणा

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अफगाण ड्रोननी इस्लामाबादमधील पाकिस्तानी लष्कराच्या कमांड सेंटरवर अचूक प्रहार केला. या हल्ल्यात केवळ कमांड सेंटरच नाही, तर सैनिकांची निवासस्थाने आणि मोठा शस्त्रास्त्रांचा साठा असलेला डेपोही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. इस्लामाबादच्या मध्यवर्ती भागात झालेला हा हल्ला पाकिस्तानसाठी सर्वात मोठी नामुष्की मानली जात आहे, कारण राजधानीच्या सुरक्षिततेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Island: जगातील सर्वात अनोखी चव! होर्मुझचे लोक खातात चक्क लाल मातीचा सॉस; जाणून घ्या यामागील सत्य

पाकिस्तानी हल्ल्यांचा तालिबानी ‘बदला’

तालिबान सरकारने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई म्हणजे पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर केलेल्या हल्ल्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे. पाकिस्तानने ‘ऑपरेशन गझब लिल हक’ अंतर्गत काबूल, पक्तिया आणि कंधार यांसारख्या निवासी भागांवर बॉम्बहल्ला केला होता. त्या हल्ल्यात निष्पाप महिला आणि मुलांसह अनेक नागरिक मारले गेले होते. आपल्या नागरिकांच्या रक्ताचा बदला घेण्यासाठीच तालिबानने थेट इस्लामाबादच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला.

NEW: Authorities in Pakistan now confirm a drone has struck on a military camp in Rawalpindi. The drone struck Hamza Camp Block 28 top floor. No loss of life reported. The explosion however damaged the windows of the building. Footage (1) shows smoke rising from Hamza Camp.… pic.twitter.com/kNF1cHL6rK — Major Sammer Pal Toorr (Infantry Combat Veteran) (@samartoor3086) March 13, 2026

credit – social media and Twitter

इस्लामाबादमध्ये भीतीचे वातावरण आणि ‘हाय अलर्ट’

या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी तातडीची बैठक बोलावून संपूर्ण इस्लामाबादमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकेबंदी करण्यात आली असून मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानने अद्याप अधिकृतपणे नुकसानीचा आकडा जाहीर केला नसला तरी, स्थानिक सूत्रांच्या मते लष्करी तळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सामान्य जनता आता पुन्हा एकदा हल्ले होतील या भीतीने घराबाहेर पडण्यास घाबरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Missile City: इराणकडे आहे अंडरवर्ल्ड मृत्यू पेरणाऱ्या क्षेपणास्त्रांचा गुप्त अड्डा; अमेरिकन नौदलासाठी ठरणार आव्हान

चीनची मध्यस्थी: युद्ध थांबणार का?

या वाढत्या तणावामुळे दक्षिण आशियात महायुद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी चीनने आता मैदानात उडी घेतली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अफगाण परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. “रक्तपात थांबवून संवादाने प्रश्न सोडवा,” असा सल्ला चीनने दिला असला तरी, दोन्ही देशांमधील द्वेष पाहता हे इतक्या लवकर शांत होईल असे दिसत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तालिबानने इस्लामाबादमध्ये कोठे हल्ला केला?

    Ans: तालिबानने इस्लामाबादच्या फैजाबाद परिसरातील 'हमजा' (Hamza Military Center) या लष्करी तळावर ड्रोन हल्ला केला आहे.

  • Que: या हल्ल्याचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेत शिरून केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी तालिबानने ही कारवाई केली आहे.

  • Que: हल्ल्यानंतर इस्लामाबादची स्थिती काय आहे?

    Ans: संपूर्ण इस्लामाबादमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक मुख्य रस्ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले आहेत.

Web Title: Taliban drone attack on islamabad hamza military center destroyed pakistan alert marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • Afghanistan-Pakistan Conflict

संबंधित बातम्या

इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू
1

इराण-इस्त्रायल युद्ध सुरु असतानाच आता आणखी दोन देशांत संघर्ष; रुग्णालयावरच केला हल्ला, 400 जणांचा मृत्यू

Pak-Afghan War : युद्ध थांबवा नाहीतर…, पाक-अफगाण युद्धवार संतापला चीन; दिला गंभीर इशारा
2

Pak-Afghan War : युद्ध थांबवा नाहीतर…, पाक-अफगाण युद्धवार संतापला चीन; दिला गंभीर इशारा

War Update : ईदच्या तोंडावर पाकिस्तानचा ‘नीच’पणा! अफगाण भूमीवर बॉम्बफेक आणि हवाई हल्ले; तालिबानने केली भीषण प्रतिज्ञा
3

War Update : ईदच्या तोंडावर पाकिस्तानचा ‘नीच’पणा! अफगाण भूमीवर बॉम्बफेक आणि हवाई हल्ले; तालिबानने केली भीषण प्रतिज्ञा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.