Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दहशतवाद अन् ड्रग्ज…’, पाकिस्तानचे ‘हे’ षड्यंत्र झाले उघड, नेमकं काय आहे प्रकरण?

पाकिस्तान आणि तालिबानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानवर गंभीर आरोप आहेत. तालिबानने पाकिस्तानच्या कटकारस्थानांचा खुलासा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2025 | 08:20 PM
Taliban exposes Pakistan's conspiracy against Afghanistan

Taliban exposes Pakistan's conspiracy against Afghanistan

Follow Us
Follow Us:

काबूल: पाकिस्तान आणि तालिबानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानवर गंभीर आरोप आहेत. तालिबानने पाकिस्तानच्या कटकारस्थानांचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानवर दहशतवाद्यांना आसरा देत असल्याचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना तालिबानने दावा केला आहे की, पाकिस्तानच त्यांच्या राज्यात अस्थिरता निर्माण करण्यासाठी दहशतवादाला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला प्रोत्साहन देत आहे.

इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘सेंट्रल कमिशन फॉर सिक्युरिटी अँड क्लिअरन्स अफेयर्स’ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात पाकिस्तानवर गंभीर आरोप करत त्यांच्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून देशात अंमली पदार्थांची तस्करी वाढवत आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी मोहिमेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प ॲक्शनमोडमध्ये! सत्ता हाती घेताच बेकायदेशीर भारतीयांवर उगारला कारवाईचा बडगा

पाकिस्तानकडून अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादाला पाठिंबा

तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारे रसायने अवैध मार्गाने अफगाणिस्तानात पोहोचवले जात आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील अरनाई, लोरलई आणि गुलिस्तान या भागांत अफूची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.

पाकिस्तान अफगाणिस्तानवर अंमली पदार्थांच्या व्यापाराचा आरोप करत असला तरी, प्रत्यक्षात या तस्करीत पाकिस्तानच मुख्य भूमिका बजावत आहे, असे तालिबानने स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार घडवण्याचा पाकिस्तानचा कट

याशिवाय, पाकिस्तानकडून दहशतवादी गटांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा तालिबानने केला आहे. अहवालानुसार, पाकिस्तानच्या कबायली भागांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येते आणि त्यांना अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी पाठवले जाते.

बलुचिस्तानमधील काही भागांत या गटांना आसरा दिला जात आहे. तसेच, कराची आणि इस्लामाबादमधील विमानतळांच्या माध्यमातून पाकिस्तान या कारवाया राबवत असल्याचे तालिबानने म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार घडवणारे पाकिस्तानचे नागरिक?

तालिबानच्या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये बहुसंख्य पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग आहे. अफगाणिस्तानात अस्थिरता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी गट मिळून काम करत आहेत.

तालिबानने हेही नमूद केले आहे की, पाकिस्तान हा अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवत असून, दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीद्वारे संपूर्ण प्रदेशातील शांतता धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – ट्रम्पच्या ‘टॅरिफ’मुळे संतापला चीन; बदला घेण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय, काय आहे ड्रॅगनची संपूर्ण योजना?

Web Title: Taliban exposes pakistans conspiracy against afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • pakistan

संबंधित बातम्या

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू
1

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral
2

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
3

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.