
पाकिस्तान : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पाकिस्तान अणुऊर्जा आयोग (पीएईसी) च्या कर्मचाऱ्यांसह 16 शास्त्रज्ञांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ताबडतोब शोध मोहीम राबवत आठ ओलिसांची यशस्वीरित्या सुटका केल्याचेही सांगितले जात आहे. पण टीटीपीच्या या पावलामुळे मात्र आसपासच्या देशांची डोकेदुखी वाढणार आहे.
काबुल खेल अणुऊर्जा खाण प्रकल्पात कामावर जाणाऱ्या कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. बंदुकीच्या धाकावर लोकांना ओलीस ठेवल्यानंतर, हल्लेखोरांनी त्यांचे वाहन पेटवून दिले आणि तेथून पळून गेले. स्थानिक पोलिसांनी आठ ओलिसांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्यांपैकी तिघेजण ऑपरेशन दरम्यान जखमी झाले होते, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित ओलिसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
महाकुंभवर ‘HMPV’ व्हायरसचं सावट! उत्तर प्रदेशमध्ये आढळला पहिला रूग्ण, चिंता वाढली
टीटीपीने शास्त्रज्ञांच्या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि अपहरण केलेल्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. फुटेजमध्ये, काही ओलिसांनी अधिकाऱ्यांना टीटीपीने केलेल्या मागण्या मान्य करून आपली सुटका करावी, असे आवाहन केले आहे. अपहरणकर्त्यांनी आपल्या मागण्यामध्ये पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या टीटीपी कैद्यांची सुटका करण्याचे आवाहन केलं आहे. त्याचबरोबर या टीटीपीच्या अपहरणकर्त्यांनी अणुऊर्जेसाठी लागणारे युरेनियमही लुटल्याचा दावा करण्यात आला आहे.
अपहरण केलेले कामगार ऊर्जा, शेती आणि औषध यासारख्या क्षेत्रात शांततापूर्ण अणुउपयोगांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करणारी संस्था PAEC अंतर्गत खाण प्रकल्पांमध्ये कार्यरत होते. पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांचा हा सततचा सिलसिला सुरू असतानाच ही अपहरणाची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या फुटीरतावादी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये, एका दुर्गम जिल्ह्यातील सरकारी कार्यालये आणि बँकेला लक्ष्य करण्यात आले. जरी यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या हल्ल्यातून देशभरात दहशतवाद्यांच्या कारवायांची वाढती तीव्रता दिसून येऊ लागली आहे.
विराट कोहली परिवारासह प्रेमानंद महाराजांकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रंग दाखवणार का?
टीटीपी आणि बलुच बंडखोर अफगाणिस्तानातील त्यांच्या ठिकाणांवरून काम करत असल्याचा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. पण काबूलने हा आरोप फेटाळून लावला आहे. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या टीटीपीला अलिकडच्या मूल्यांकनात अफगाणिस्तानातील सर्वात मोठा दहशतवादी गट म्हणून वर्णन केले आहे, ज्याचे हजारो लढाऊ या प्रदेशात कार्यरत आहेत.