फोटो सौजन्य - युट्युब
विराट कोहली – अनुष्का शर्मा : सध्या विराट कोहलीसाठी मैदानात काहीही बरोबर चालले नाही. किंग कोहलीसाठी ऑस्ट्रेलियन दौरा एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी राहिला नाही आणि त्याला कसोटी संघातून वगळण्याची मागणी केली जात आहे. सततच्या फ्लॉप शोमुळे त्रस्त झालेला विराट आपल्या खराब फॉर्मपासून मुक्त होण्यासाठी वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांकडे पोहोचला. विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्याची दोन मुलेही दिसली. कोहलीच्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून चॅम्पियन्स ट्रॉफी खूप महत्त्वाची मानली जाते. याआधी विराटला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत फॉर्ममध्ये येण्याची चांगली संधी असेल.
IND W vs IRE W : भारताला संघाला मिळाले पहिले यश, साधूने सारा फोर्ब्सला पाठवले पॅव्हेलियनमध्ये
प्रेमानंद महाराज यांच्या युट्युब चॅनेलवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये विराट कोहली आणि अनुष्काने सर्वप्रथम प्रेमानंद महाराजांना नमस्कार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर महाराजांनी दोघांचीही तंदुरुस्ती विचारली. अनुष्काने महाराजांना सांगितले, मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न होते. मला वाटलं विचारावं पण बसलेल्या सगळ्यांनी ते प्रश्न विचारले. महाराजांनी सांगितले की, आपण अध्यात्माच्या माध्यमातून लोकांना आनंद देत आहोत आणि ते एका खेळाद्वारे संपूर्ण देशाला आनंद देत आहेत.
Virat Kohli और Anushka Sharma की पूज्य महाराज जी से क्या वार्ता हुई ? Bhajan Marg pic.twitter.com/WyKxChE8mC
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) January 10, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी विराट कोहलीने प्रेमानंद महाराजांना भेट दिली. कोहलीचा अलीकडचा फॉर्म खूपच खराब आहे आणि तो धावांसाठी खूप आसुसलेला दिसतो. कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या दरबारात बसलेला दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचा आणि मुलाचा चेहरा लपवण्यात आला आहे. दोघांनीही मुलगी वामिका आणि मुलगा अकायचा त्याचबरोबर परिवाराचा आयुष्य प्रायव्हेट ठेवले आहे.
खरंतर २०२३ च्या सुरुवातीला विराट कोहली अशाच प्रकारे प्रेमानंद महाराजांच्या आश्रयाला पोहोचला होता. यानंतर किंग कोहलीने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत सलग दोन शतके झळकावली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराटसाठी २०२३ हे वर्ष आश्चर्यकारक ठरले. कोहलीने २७ सामन्यांच्या २४ डावांमध्ये ७२.४७ च्या जोरदार सरासरीने १३७७ धावा केल्या होत्या. विराटने ६ शतके आणि ८ अर्धशतके केली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हरवलेला फॉर्म परत मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. इंग्लिश संघाविरुद्ध ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये कोहलीचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. विराटने ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ च्या सरासरीने १३४० धावा केल्या आहेत. किंग कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत.