
Tejas makes a splash at Dubai Air Show India's powerful defense technology will shine
दुबई एअर शो 2025 मध्ये तेजस आणि सूर्यकिरण टीमच्या अद्भुत कामगिरीद्वारे भारत आपली संरक्षण शक्ती प्रदर्शित करणार.
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत बैठक घेऊन संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर देणार.
DRDO, HAL आणि १९ भारतीय कंपन्या उन्नत एरोस्पेस तंत्रज्ञान, स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि आधुनिक संरक्षण प्रणालीचे प्रदर्शन करणार.
Dubai Air Show 2025 : दुबई एअर शो 2025 ( Dubai Air Show 2025) ची जगभरात उत्सुकता असताना, भारतासाठी हा वर्षाचा सर्वात मोठा क्षण ठरत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एरोस्पेस प्रदर्शनात भारत आपल्या आधुनिक संरक्षण क्षमतांचा दणदणीत परिचय देणार आहे. भारतीय हवाई दलाची सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि ‘एलसीए तेजस’(LCA Tejas) ही स्वदेशी लढाऊ विमाने दुबईच्या आकाशात अद्भुत हवाई कौशल्य दाखवतील. यावेळी भारताचे अत्याधुनिक शस्त्रास्त्र, संरक्षण तंत्रज्ञान आणि एरोस्पेस नवकल्पना जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरणार आहेत.
या भव्य एअर शोमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान ते यूएईच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेतील. त्याचबरोबर भारत, यूएई, अमेरिका, युनायटेड किंग्डम, इटली, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमधील ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय संरक्षण कंपन्यांसोबत उद्योग गोलमेज परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
उद्देश एकच, भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवणे, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण मजबूत करणे आणि जागतिक एरोस्पेस बाजारात भारतीय उपस्थिती अधिक बळकट करणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Unrest: ढाक्यात हाय-अलर्ट! शेख हसीना यांच्या निकालापूर्वीच हिंसाचाराचा भडका; स्फोट–दंगल–बंदचा कहर
DRDO ने आधीच X (पूर्वी ट्विटर) वर घोषणा केली आहे,
“प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञानापासून नेक्स्ट-जनरेशन संरक्षण प्रणालींपर्यंत, भारत आपल्या क्षमतांचे मोठ्या अभिमानाने प्रदर्शन करणार आहे.”
HAL, कोरल टेक्नॉलॉजीज, SFO टेक्नॉलॉजीज, डेंटल हायड्रॉलिक्स आणि इतर भारतीय गटांसाठी खास इंडिया पॅव्हेलियन उभारण्यात आला आहे. याशिवाय १९ भारतीय संरक्षण कंपन्या स्वतंत्रपणे त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. यात भारत फोर्ज, ब्रह्मोस, टेक महिंद्रा, HBL इंजिनिअरिंग यांसारख्या महाकाय कंपन्यांचा समावेश आहे.
Raksha Rajya Mantri (#RRM) Shri Sanjay Seth will lead an Indian delegation to the Dubai Air Show 2025, scheduled to be held on 17–18 November 2025 in the United Arab Emirates. The delegation includes senior officers from the Department of Defence, Department of Defence… pic.twitter.com/GUtKmeAdiw — Defence Production India (@DefProdnIndia) November 16, 2025
credit : social media
या कार्यक्रमात १५ भारतीय स्टार्टअप्सही सहभागी होत आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, हवाई सुरक्षा उपाय, एआय-आधारित संरक्षण प्रणाली आणि भविष्यातील युद्धक्षमता यांसाठी ते अत्याधुनिक प्रकल्प सादर करतील. हे स्टार्टअप्स जागतिक बाजारासाठी संभाव्य भागीदारी आणि गुंतवणुकीची संधी शोधणार आहेत.
सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि स्वदेशी तेजस लढाऊ विमानांचा ताफा आधीच दुबईच्या अल मकतूम हवाईतळावर पोहोचला आहे.
भारतीय हवाई दलाच्या एक्स हँडलवर म्हटले आहे की,
“भारतीय हवाई दलाचा तुकडा दुबई एअर शोसाठी तयार आहे.”
या शोमध्ये जगभरातील १०० हून अधिक हवाई दल सहभागी होत असून, प्रत्येक देश आपापली ताकद, नवी क्षमता आणि एरोस्पेस तंत्रज्ञान दाखवणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
१९८६ मध्ये ‘अरब एअर’ नावाने सुरू झालेला हा शो त्या वेळी केवळ २०० प्रदर्शक आणि २५ विमानांपुरता सीमित होता. परंतु आज, हा कार्यक्रम जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठ्या एरोस्पेस कार्यक्रमांपैकी एक बनला आहे.
२०२५ मध्ये अपेक्षित आहेत :
१,५००+ प्रदर्शक
१४८,००० उद्योग अभ्यागत
२००+ आधुनिक विमाने
३५०+ जागतिक एरोस्पेस तज्ज्ञ
या सर्वांच्या उपस्थितीत भारताचे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेणे स्वाभाविक आहे.
दुबई एअर शोच्या माध्यमातून भारत जगाला स्पष्ट संदेश देणार आहे:
“आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाने सज्ज आहोत, सक्षम आहोत आणि जागतिक एरोस्पेस क्षमतांना नवे परिमाण देण्यासाठी तयार आहोत.”
तेजसची गर्जना, सूर्यकिरणच्या हवाई कलेचा चित्तथरारक जलवा आणि भारतीय स्टॉल्समधील आधुनिक तंत्रज्ञान हे या वर्षीचे भारताचे सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे.