भारतात द्वेष पसरवणाऱ्या पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने नेपाळमध्ये तिरंगा फडकावला; पाकिस्तानात संतापाची लाट( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पाकिस्तानी रॅपर तल्हा अंजुमने नेपाळमधील कार्यक्रमात भारतीय तिरंगा फडकावल्याने पाकिस्तानात संतापाची लाट उसळली.
पूर्वी भारताविरुद्ध अपशब्द, भारतीय सैन्यावर आरोप आणि काश्मीर प्रश्नावर विषारी पोस्ट करणाऱ्या अंजुमचा हा पीआर स्टंट असल्याची टीका.
भारतात YouTube चॅनल बंद झाल्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाला, त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप.
Talha Anjum Indian flag Nepal concert : पाकिस्तानचा (Pakistan) वादग्रस्त रॅपर तल्हा अंजुम(Talha Anjum) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताविरुद्ध विषारी भाष्य, भारतीय सैन्यावर अपशब्द आणि काश्मीर प्रश्नावर उघडपणे भारतविरोधी भूमिका घेणारा हा रॅपर आता अचानक मैत्रीचा संदेश देत नेपाळमधील कार्यक्रमात भारतीय तिरंगा फडकावताना दिसला. त्याच्या या कृतीमुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर पाकिस्तानी वापरकर्त्यांकडून त्याला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.0
रविवारी (१६ नोव्हेंबर) नेपाळमध्ये आयोजित एका संगीत महोत्सवात अंजुमने स्टेजवर भारताचा तिरंगा हातात घेतला आणि तो पाठीवर झाकत रॅप सादर केला. उपस्थित प्रेक्षकांमध्ये यामुळे आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर या व्हिडिओने जोरदार धुमाकूळ घातला आणि पाकिस्तानातील अनेकांचे डोळे टांगले. अंजुमने हे सर्व “मैत्रीचा संदेश देण्यासाठी” केल्याचा दावा केला. मात्र, त्याची ही अचानक झालेली ‘मैत्री’ पाकिस्तानी नागरिकांना अजिबात रुचलेली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
पाकिस्तानी ट्रोलर्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तेव्हा अंजुम स्वतः बचावासाठी पुढे आला. त्याने एक्स (माजी ट्विटर) वर लिहिले –
“माझ्या हृदयात द्वेषाला स्थान नाही. माझी कला सीमांपलीकडे जाते. वाद निर्माण झाला तरी मी तिरंगा पुन्हा उचलेन.”
तसेच त्याने आपल्या देशातील मीडिया व सरकारवरही निशाणा साधला.
तो म्हणाला की, “मला पाकिस्तानच्या युद्धखोर सरकारची किंवा त्यांच्या प्रचारयंत्रणेची पर्वा नाही.”
My heart has no place for hate. My art has no borders. If me raising an Indian flag sparks controversy so be it. I’ll do it again.. will never care about the media, the war mongering governments and their propagandas. Urdu Rap is and will always be borderless.. 🇵🇰 🇳🇵 🇮🇳 — Talha Anjum (@talhahanjum) November 16, 2025
credit : social media
त्याची ही भूमिका पाकिस्तानातील कट्टरपंथी आणि राष्ट्रवादी गटांना चांगलीच चुकली.
भारताविरुद्ध कडवट भूमिका घेणारा अंजुम अचानक बदलताना दिसत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कधी तो काश्मीर ‘स्वातंत्र्य’साठी उघडपणे भारताला दोष देतो,
कधी पुलवामा हल्ल्यासारख्या दहशतवादी कृत्यासाठी भारतालाच जबाबदार धरतो,
इतकेच नव्हे तर भारतीय सैन्यावरही त्याने अनेकदा अपशब्द वापरले आहेत.
या पार्श्वभूमीवर त्याचा तिरंगा फडकावणारा हा प्रकार अनेकांच्या मते एक स्वच्छ PR स्टंट आहे.
Talha Anjum is waving the Indian flag at a Nepal concert while #India blocks his Spotify & likely his YouTube — is a sad reminder of our own national decay. No pride, no dignity… just performers desperate for applause from those who shut them out.@talhahanjum #Pakistan #Nepal pic.twitter.com/LzErLEwPfs — Rizwan Shah (@rizwan_media) November 16, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई
अंजुम भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होता. त्याचा “कौन तल्हा” हा रॅप तर भारतात प्रचंड व्हायरल झाला होता. भारतातील त्याच्या YouTube चॅनलवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते. मात्र, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सरकारने त्याचे YouTube चॅनल भारतामध्ये बंद केले. त्यानंतर त्याच्या व्हिडिओंच्या व्ह्यूजमध्ये मोठी घट झाली.
बंदीपूर्वी शेवटच्या दोन व्हिडिओंना मिळाले : १.२ कोटी २९ लाख व्ह्यूज
बंदीनंतर त्याच प्रकारच्या व्हिडिओंना मिळाले : फक्त ६४१,००० व्ह्यूज
स्पष्ट आहे की भारतीय प्रेक्षक दूर गेल्यावर अंजुमचा ‘स्टारडम’ही कोसळला.
याच कारणामुळे तो भारतीय चाहत्यांना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चाही सुरू आहे.
I feel pity for the ppl who are mocking him for this ngl..
The fans gave him the Indian flag and he gracefully accepted n even performed wid it..so cute yrr..
What else should he have done ?? Throw the flag in the dirt like Panther said “Fu*k u” when his fan said love from Pak ?? pic.twitter.com/9BdrzIMirc — ANSHIT (@shaiyaxh) November 16, 2025
credit : social media
पाकिस्तानात अंजुमवर टीकेचा भडीमार होत असला तरी त्याचे समर्थक म्हणतात की कला सीमा ओलांडते. परंतु भारतीय आणि पाकिस्तानी सोशल मीडियावर बहुतेकांचे मत एकच, तल्हा अंजुमचा अचानक बदललेला ‘मूड’ हा भारतीय बाजारपेठ पुन्हा जिंकण्यासाठी रचलेला पीआर स्टंट आहे.






