
Trump Orders Blockade of Venezuela
गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ एक तेल टँकर जप्त केला होता. याशिवाय लष्करी दलही तैनात करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर ड्रग्ज तस्करीचे आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी तेलाचा वापर करत आङे. यामुळे अमेरिकेचे सैन्य त्यांना रोखण्यासाठी तैनाती चालूच ठेवेल. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला पूर्णपणे वेढले आहेत. ट्रम्प यांच्या मते, व्हेनेझुएला त्यांच्या तेलाची, जमिनीची चोरी करत आहे. हे परत केल्याशिवाय व्हेनेझुएलावरील कारवाई थांबणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांवी अमेरिकेच्या आरोपांना फेटाळले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेसमोर न झुकण्याचे ठरवले आहे. त्यांनी मंगळवारी (१६ डिसेंबर) एका सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आम्ही आमच्या मातृभूमीचे रक्षण करणार आहोत. आमच्या भूमीत शांतता आणि आनंद कायम राहिल असे त्यांनी म्हटले आहे.
व्हेनेझुएलात तेलाचे मोठे साठे आहे. जगातील सर्वा मोठ्या तेलाचा साठा येथे असून दररोज दहा लाख बॅरल तेलाचे उत्पादन व्हेनेझुएलात केले जाते. परंतु ट्रम्प यांच्या कारवाईमुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कारण, व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेल उत्पादनावर अवलंबून आहे. शिवाय यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो जनतेसोबत राजधानी कराकसमध्ये जल्लोष साजरा करताना दिसले. या जल्लोषात अध्यक्ष मादुरो स्टेजवर नाचताना दिसले. जोरदार आवाजा गाणी म्हणत जनतेसोबत मादुरो थिरकाताना दिसले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ट्रम्प यांच्या धमकीनंतरही मादुरो निर्धास्त होते.
Ans: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामधून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व तेल टॅंकरवर नाकाबंदीचे आदेश दिले आहेत.
Ans: व्हेनेझुएलावर नाकाबंदीचा निर्णय घेताला असून तेल टॅंकरवर पूर्ण बंदीचे आदेश दिले आहेत. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.
Ans: व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था तेल उत्पादनावर अवलंबून असल्याने याचा मोठा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
Ans: अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर ड्रग्ज तस्करीचे आरोप केले आहे. ट्रम्पच्या मते, अमेरिकेत व्हेनेझुएलातून ८० टक्के ड्रग्ज तस्करी केली जाते. मादुरो स्वत: या ड्रग्ज कार्टेलला चालवतात.