Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! मध्यपूर्वेतील १८०० हून अधिक विमाने रद्द; हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले

अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) बंद केल्यामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियाला जोडणारे प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. परिणामी, विविध देशांतील १८०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 05:10 PM
Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! (Photo Credit- X)

Iran-Israel युद्धाचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • इराणवरील हल्ल्याचा मोठा फटका हवाई वाहतुकीवर!
  • मध्यपूर्वेतील १८०० हून अधिक विमाने रद्द
  • हजारो प्रवासी विमानतळांवर अडकले
Middle East Airport Closed 1800 Flights Cancel: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचे पडसाद आता जागतिक हवाई वाहतुकीवर उमटू लागले आहेत. या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, शनिवारपासून या क्षेत्रातील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) बंद केल्यामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियाला जोडणारे प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. परिणामी, विविध देशांतील १८०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत.

प्रमुख विमानतळ आणि विमान कंपन्यांना मोठा फटका

एव्हिएशन अॅनॅलिटिक्स फर्म ‘सिरियम’च्या आकडेवारीनुसार, दुबई, अबू धाबी आणि दोहा यांसारख्या मोठ्या हब विमानतळांवरील कामकाज ठप्प झाले आहे. एमिरेट्स (Emirates), कतर एअरवेज (Qatar Airways) आणि एतिहाद (Etihad) यांसारख्या दिग्गज विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे थांबवली आहेत. एमिरेट्सने रविवार दुपारपर्यंत दुबईची सर्व उड्डाणे निलंबित केली आहेत, तर कतर एअरवेजचे कामकाज सोमवार सकाळपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे.

विमानतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचे सावट

केवळ हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळेच नव्हे, तर प्रत्यक्ष विमानतळांवर झालेल्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दोन प्रमुख विमानतळांवर इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोननी हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले, तर अबू धाबीच्या झायद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हल्ले झाल्याचे वृत्त आहे.

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

प्रवाशांना महागड्या तिकिटांचा बसणार फटका

हवाई वाहतूक विश्लेषकांच्या मते, आगामी काळात प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मध्यपूर्वेतून जाणारी उड्डाणे आता सौदी अरबच्या मार्गे वळवण्यात येत आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ वाढणार असून इंधनाचा वापरही वाढणार आहे. परिणामी, विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय विमान कंपन्यांची भूमिका

भारताच्या नागरी उड्डयन विभागाने जॉर्डन, सौदी अरब आणि लेबनानसह मध्यपूर्वेतील मोठा भाग ‘हाय-सिक्युरिटी झोन’ म्हणून घोषित केला आहे. एअर इंडियाने (Air India) मध्यपूर्वेतील सर्व नियोजित उड्डाणे तूर्तास रद्द केली आहेत. याशिवाय डेल्टा, युनायटेड, केएलएम (KLM) आणि लुफ्थांसा यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही तेल अवीव आणि लेबनानची सेवा तात्पुरती स्थगित केली आहे.

पुढील २४ ते ३६ तास महत्त्वाचे

तज्ज्ञांच्या मते, पुढील २४ ते ३६ तासांत हवाई क्षेत्राच्या वापराबाबतची स्थिती स्पष्ट होईल. अमेरिका आणि इस्रायल जेव्हा लष्करी उड्डाणांची माहिती सामायिक करतील, तेव्हा काही देशांचे हवाई क्षेत्र अंशतः उघडले जाऊ शकते. सध्याची परिस्थिती पाहता, प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे स्टेटस ऑनलाइन तपासावे, असा सल्ला विमान कंपन्यांनी दिला आहे.

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

Web Title: Iran israel war hits air traffic hard more than 1800 flights in the middle east canceled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • America
  • flight
  • iran
  • Iran-Israel War
  • Israel

संबंधित बातम्या

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ
1

Israel Vs Iran War: इराणचे राष्ट्राध्यक्ष संतापले! खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार; ‘या’ मोठ्या घोषणेमुळे जागतिक विश्वात खळबळ

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”
2

इराणवरील हल्ल्यानंतर हाहाकार; अभिनेत्री मंदाना करीमी भावुक, म्हणाली “आता गमावण्यासारखं काही उरलंच नाही…”

“जगभरात मुस्लीमांवर अन्याय..”, US-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर Ajaz Khanने व्यक्त केला संताप, अभिनेत्याचे विधान चर्चेत
3

“जगभरात मुस्लीमांवर अन्याय..”, US-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर Ajaz Khanने व्यक्त केला संताप, अभिनेत्याचे विधान चर्चेत

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक
4

World War 3 : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.