Tensions rise over Canada's new visa rules Permits of many Indian students cancelled
ओटावा: कॅनडाने आपल्या नवीन इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत. याचा थेट परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर आणि कामगारांवर होत आहे. फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या या नियमांमुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना अधिक अधिकार मिळाले आहेत. यामुळे अनेक विद्याध्यांचे परमिट रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन व्हिसा मिळवणेही कठीण झाले आहे. यामुळे भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या अडचणी
कॅनडात सध्या सुमारे 4.27 लाखे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या नव्या नियमांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फॉरेनएडमिट्स या स्थंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अगदी चांगल्या शैक्षणिक रेकॉर्ड असलेल्या विद्यार्थ्यांचेही स्टडी परमिट रद्द केले जात आहे. 2025 मध्ये जवळपास सात हजार विद्यांर्थ्यांचे व्हिसा रद्द होण्याची शक्यता आहे.
एखाद्या विद्यार्थ्याचे स्टी परिमिट रद्द झाल्यास, त्याला त्वरित कॅनडा सोडावे लागण्याची शक्यता आहे किवां त्याला कायदेशीर अपील करावी लागले. यासाठी किमान 1500 कॅनेडियन डॉलर्स खर्च येतो, पण तरीही परमिट मिळेल याची कोणतीही खात्री नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझात पुन्हा एकदा विनाशाचे वादळ; इस्त्रायलचा भयानक हल्ला
नवीन आर्थिक अटी आणि SDS व्हिसा रद्द होणार
2025 पासून कॅनडामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅनडियन डॉलर्समध्ये 20 हजार 635 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 12 ते 13 लाख रुपये GIC (Guaranteed Investment Certificate)अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र यामुळे मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबार मोठा आर्थिक भार पडला आहे. कॅनडाच्या एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्येच्या तुलनेत 35 ते 40 टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
शिवाय, स्टडी डायरेक्ट स्ट्रीम (SDS)व्हिसा बंद होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2025 च्या अखेरील SDS व्हिसा बंद होण्याची शक्यता आहे. SDS व्हिसा बंद केल्यास भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये शिक्षण घेणे कठीण होणार आहे.
भारतीय कामगारांच्या अडचणी वाढल्या
कॅनडाच्या या नवीन नियमांमुळे केवळ बारतीय विद्यार्थीच नव्हे, तर भारतीय कामगारांच्याही अडचणी वाढमार आहेत. यामुळे वर्क परमिट रद्द होण्याची शक्यता आहे, तसेच वर्क परमिट मिळणेही कठीण जाणार आहे. आधीच असलेल्या कामगारांच्या व्हिसावरही परिणाम होऊ शकतो.
कॅनडा हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि कामगासांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. मात्र, कॅनडाच्या या नव्या इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणांमुळे अनेकांना अडचणींना सामोर जानवे लागणार आहे. अतिरिक्त कागदपत्रे, कठोर निरिक्षण आणि वाढलेली आर्थिक अट यामुळे कॅनडामध्ये जाण्याचे स्वप्न आता आणखी कठीण होणार आहे.