SCO शिखर परिषदेपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण हल्ला झाला
इस्लामाबाद: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन ( SCO) परिषद 15-16 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पार पडणार होती. दरम्यान एक मोठी दुर्घटना पाकिस्तानमधून समोर आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये भीषण हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बंदूकधाऱ्यांनी 20 खाण कामगारांची हत्या केली आहे तर 7 जणांना जखमी केले आहे. पाकिस्तान पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलुचिस्तान प्रांतात हा ताजा हल्ला देशाच्या राजधानीत होणाऱ्या एका मोठ्या सुरक्षा शिखर परिषदेच्या काही दिवसांपूर्वी आला आहे. पोलिस अधिकारी हमायून खान नसीर यांनी म्हटले की, गुरुवारी रात्री उशिरा बंदुकधारींनी दुकी जिल्ह्यातील कोळसा खाणीजवळील घरांवर हल्ला केला. त्यांनी निवासी भागाला चारही बाजूंनी घेरले होते आणि अचानक गोळीबार सुरू केला. याशिवाय हल्ल्याच मृतांपैकी तीन आणि जखमींपैकी चार अफगाण वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, अद्याप हा हल्ला कोणी केली या बाबत कोणतीही माहिती नाही.
STORY | 20 killed in attack on miners in Pakistan
READ: https://t.co/rAjrSSy7vG pic.twitter.com/9lO7E2QeIv
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2024
खाणी आणि यंत्रांना आग लागली
मिळालेल्या माहितीनुसार, डुकी जिल्ह्याचे राजकीय प्रमुख हाजी खैरुल्ला नसीर यांनी या घटनेबाबत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना बलुचिस्तान प्रांतातील डुकी जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात अनेकांची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी सशस्त्र हल्लेखोरांनी खाणी आणि यंत्रसामग्री पेटवून दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच हा हल्ला कोणी केला याबाबत तपास सुरू आहे.
पोलिस व्हॅनवरही हल्ला करण्यात आला
मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्या पूर्वी पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात देखील पोलिस व्हॅनवर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. ज्यामध्ये पाकिस्तानचे दोन पोलिस अधिकारी शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. हा हल्ला देखील कोणी केला याबाबत कोणती माहिती मिळाली नाही. संशयित दहशतवाद्यांनी अचानक व्हॅनवर हल्ला केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा- इस्रायल-हिजबुल्लाह युद्धादरम्यान तुर्की नौदलाचा बेरूतमध्ये प्रवेश; नेमकं कारण काय?