फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बेरूत: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाहमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. इराण, इस्त्रायल, हिजबुल्लाह, लेबनॉन, बेरूत या
प्रचंड मुकसान झाले आहे. अनेक लोकांना या युद्धामुळे आपल्या जीव गमवावा लागला आहे. ही युद्ध थांबण्याची कोणतीही
चिन्हे दिसून येत नाही. दरम्यान इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तुर्कीने आपली नौदल सेना बैरूतमध्ये पाठवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या नागरिकांना बेरूतमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तुर्कीने नौदलाची जहाजे पाठवली आहेत. तुर्की नौदलाने दिलेल्या माहितूनुसार, बुधवारी रात्री उशिरा 2,000 हून अधिक तुर्की नागरिक आणि काही परदेशींना बेरूतमधून बाहेर काढण्यात आले. तुर्कीच्या दक्षिण-पूर्वेकडील मार्डिन शहरातील रहिवासी झेहरा सिब्बीन इतर निर्वासितांसह बेरूतमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या स्थालांतरित लोकांनी बेरूतमधील परिस्थीबद्दल सांगताना म्हटले आहे की, ‘तेथील परिस्थितीचे शब्दात वर्णन करता येणार नाही. सतत बॉबम्ब हल्ले करण्यात येत आहेत. असे वाटले की सर्व काही संपले आहे. आम्हाला आता बेरूतमध्ये राहायचे नाही.’
तुर्की जहाजे बेरूतला पोहोचली
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की नागरिकांना नौदलाने चालवल्या जाणाऱ्या टीसीजी बायरक्तर आणि टीसीजी संक्तार या जहाजांद्वारे परत पाठवण्यात येणार आहे. तसेच दक्षिण तुर्कीमधील मेर्सिन बंदरातून अन्न, स्वच्छता किट, भांडी, तंबू, बेड आणि ब्लँकेटसह 300 टन मानवतावादी पुरवठा घेऊन सहा जहाजे बेरूतला पोहोचली आहेत. तुर्की नागरिकांव्यतिरिक्त, बल्गेरिया, रोमानिया आणि कझाकिस्तानमधील लोकांनीही तुर्कीकडे मदत मागितली आहे. अद्याप याबाबत आणखी कोणतीही माहिती अधिकाऱ्यांनी संख्या जाहीर केलेली नाही.
दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले
इस्त्रायलआणि हिजबुल्लाहमधील वाढत्या संघर्षामुळे लेबनॉनमधील तुर्कीचे राजदूत अली बारिस उलुसोय यांनी म्हटले आहे की, “इस्रायलच्या आक्रमणामुळे लेबनॉनवर वाईट परिणाम झाला आहे आणि आमच्या बांधवांवर 1,300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. या हल्ल्यामुळे 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.”