फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनाझेशन ( SCO) परिषद 15-16 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पार पडणार आहे. दरम्यान ही परिषद सुरू होण्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांच्या पीटीआय संस्थेला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2014 च्या हल्ल्याची पृनरावृत्ती यावेली होऊ दिली जाणार नाही. ज्यामुळे चीनी राष्ट्रपतींना त्यांचा दौरा रद्द करावा लागला होता. या परिषदेत भारताच्या बाजून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर इस्लामाबादमध्ये होणाऱ्या SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नेतृत्व करणार आहेत.
पाकिस्तान एससीओ या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. पीएम शरीफ यांनी म्हटले आहे की, या परिषदेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. या परिषदेत चीनचे पंतप्रधानही पाकिस्तान भेट देणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, देश विकासमार्गावर जात असताना त्यांना एखाद्या विशिष्ट पक्षाचा विकासात अडथळा निर्माण करणे मान्य नाही. असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
SCO भारतासाठी महत्त्वाचे का आहे?
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असतानाही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत SCO महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. 2016 पासून पाकिस्तानमध्ये झालेल्या कोणत्याही सार्क परिषदेत भारताने सहभाग घेतला नव्हता. संसाधनांनी समृद्ध मध्य आशियाई देशांसोबत सहकार्य वाढवण्यासाठी SCO नवी दिल्लीला एक व्यासपीठ प्रदान करते. 1991 मध्ये स्थापन झाल्यापासून भारताचे या देशांशी जवळचे संबंध नाहीत. अशा परिस्थितीत भारतानेही या पावलाने SCO समूहाला दिलेले महत्त्व दाखवून दिले आहे.
SCO भारताला कशी मदत करेल?
SCO चे प्रादेशिक दहशतवाद विरोधी फ्रेमवर्क (RATS) देखील भारताच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचा सामना करण्यासाठी मदत करते. मीडिया रिपोर्टनुसार, SCO सदस्य देशांना दहशतवादविरोधी सराव तयार करण्यास आणि आयोजित करण्यास, सदस्य देशांच्या गंभीर गुप्तचरांची तपासणी करण्यास आणि दहशतवादी कारवाया आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवरील इनपुट सामायिक करण्यास मदत करते.