
Thailand Combodia signs ceasefire agreement at Asean Summit in Presence of Trump
Thailand Combodia Ceasefire : क्वालालंपूर : दक्षिण आशियातील थायलंड आणि कंबोडियात देशांतील दशकांपासून सुरु असलेला संघर्षावर आता विराम लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार करण्यात आला आहे. रविवारी (२६ ऑक्टोबर) युद्धबंदी करार वाढवण्यासाठी स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार मलेशियात (Malaysia) आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक आसियान शिखर परिषदेदरम्यान झाला आहे. जिथे ट्रम्पच्या उपस्थितीत कंबोडिया आणि थायलंडच्या नेत्यांनी करारावर स्वाक्षरी केली.
हा वाद थायलंड आणि कंबोडियासाठी ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित करण्यात आले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्ष झाला होता.
दरम्यान जुलै २०२५ मध्ये दोन्ही देशांत पुन्हा वाद सुरु झाला होता. दोन्ही देशाचे सैनिक पुन्हा एकदा सीमेवर आमने-सामने आले होते. दरम्यान ट्रम्प यांनी बिघडती परिस्थिती पाहता दोन्ही देशांना व्यापार शुल्क वाढवण्याची धमकी दिली. ज्यामुळे दोन्ही देश शांततेच्या टेबलावर एकत्र आले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी कारारात विस्तार झाला आहे. याअंतर्गत थायलंड कंबोडियाच्या १८ सैनिकांची सुटका करणार आहे. तसेच दोन्ही देश सीमा भागातून सैन्य माघारी घेणार आहे.
BREAKING: Cambodia and Thailand sign an expansion of a ceasefire that U.S. President Donald Trump helped broker this summer to end their border conflict. https://t.co/RiZU91lY0a — The Associated Press (@AP) October 26, 2025
दरम्यान या कराराचे आसियान शिखर परिषदेचे महासचिव गाओ फंग यांनी स्वागत केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनीही या शांतता प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यामुळे दक्षिण-आशियात स्थिरता निर्माण होईल. तसेच कंबोडियाच्या शेती, कापड उद्योगाला आणि थायलंडच्या पर्यटनाला चालना मिळेल. ट्रम्प यांनी यावर बोलताना म्हटले की, अमेरिका नेहमी आपल्या मित्र राष्ट्रांना मदत करतो. आजचा दिवस आशियासाठी शांततेचा आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. मलेशियाच्या शिखर आसियान परिषदेत काय घडले?
मलेशियाच्या शिखर आसियान परिषदेत थायलंड आणि कंबोडियात युद्धबंदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
प्रश्न २. का सुरु होता थायलंड आणि कंबोडियात संघर्ष?
हा वाद थायलंड आणि कंबोडियासाठी ऐतिहासिक वाद आहे. प्रेम विहार मंदिरावरुन हा वाद सुरु दोन्ही देशांत वाद सुरु होता.
प्रश्न ३. कोणच्या मध्यस्थीने झाला थायलंड कंबोडियात संघर्ष?
थायलंड आणि कंबोडियातील संघर्षावर मलेशियात ट्रम्प यांच्या मध्यस्थीने विराम लावण्यात आला आहे.
ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल