ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत राहत असतात. सध्या ते मलेशियाच्या दौऱ्यावर गेले आहे. येथे ट्रम्प आसियान शिखर परिषदेत सहभागी होणार आहे. २६ ते २७ ऑक्टोबर ही परिषद असणार आहे. मलेशियाने (Malayasia) आशियान असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स परिषदेसाठी ट्रम्प यांना संवाद भागीदार देश म्हणून आमंत्रित केले आहे.
दरम्यान ट्रम्प मलेशियात पोहोचले असून इथे विमानतळावर त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावेळी मलेशियाच्या काही लोकांनी त्यांचे पारंपारिक नृत्यू केले. याच वेळी ट्रम्प यांना हे पाहताच डान्स करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी देखील आपल्या अतरंगी अंदाजात डान्स करायला सुरु केली. सध्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्रम्प यांच्या या अतरंगी अंदाजाने वातावरण अगदी मजेशीर बनले होते. त्यांचा हा अंदाज पाहून मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम अन्वर आणि अधिकारी देखील हैराण झाले होते. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की, सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यावे बघत आहेत.
WELCOME DANCE: President Trump shows off his moves after exiting Air Force One in Malaysia. pic.twitter.com/PTcJlGjwKC — Fox News (@FoxNews) October 26, 2025
काय आहे ट्रम्प यांच्या भेटीचा उद्देश?
ट्रम्प यांच्या मलेशिया भेटीचा उद्देश त्यांच्यासोबत व्यापर, सुरक्षा आणि पर्यटन सहकार्य मजबूत करणे आहे. तसेच या वेळी ते परिषदेनंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहे. जिनपिंग यांच्याशी व्यापारातील वाटाघाटी, हॉंगकॉंगचे नेते जिमी लाई यांची सुटका आणि तैवान मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प शिखर परिषदेच्या द्विपक्षीय चर्चांमध्ये सहभागी होणार आहे.
दरम्यान या दौऱ्यात ट्रम्प थायलंड आणि कंबोडियातील संघर्ष संपवण्यावर देखील शांतता करारावर स्वाक्षरी करारत उपस्थित असतील. तसेच ट्रम्प या बैठकीत आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा करार मुद्यांवर चर्चा करण्याचती अपेक्षा आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा
सध्या सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या मलेशियातील अतरंगी अंदाजाची चर्चा सुरु आहे. काही लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत, तर काहीजण हे राष्ट्राध्यक्षांच्या आत्मविश्वास आणि जनतेशी असेलल्या चांगल्या संबंधाचे दृश्य असल्याचे म्हटले आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






