Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

Cuba Foreign Policy: डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांची प्राथमिकता प्रथम इराणशी असलेला संघर्ष पूर्णपणे संपवणे आहे. त्यानंतर, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे क्युबा आणि त्याच्या करारांवर केंद्रित असेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 06, 2026 | 11:15 AM
donald trump new foreign policy iran war and cuba takeover plan

donald trump new foreign policy iran war and cuba takeover plan

Follow Us
Follow Us:
  • इराणचा अंत जवळ
  • पुढचे लक्ष्य क्युबा
  • राजदूतांना आवाहन

Trump Cuba foreign policy friendly takeover : जागतिक राजकारणात खळबळ उडवून देण्याची सवय असलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांची यादी जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेचे पहिले लक्ष्य सध्या सुरू असलेला इराण संघर्ष कायमचा संपवणे हे आहे. मात्र, बातमी इथेच संपत नाही; इराणचा प्रश्न सुटताच अमेरिका आपली सर्व शक्ती ‘क्युबा’ (Cuba) या देशावर केंद्रित करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ट्रम्प यांच्या या नव्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

इराणची लष्करी ताकद धुळीस मिळाल्याचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत दावा केला की, अमेरिका आणि इस्रायली सैन्याने मिळून इराणच्या लष्करी सज्जतेचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या मते, गेल्या तीन दिवसांत अमेरिकन नौदलाने समुद्रात इराणची २४ युद्धनौका आणि जहाजे नष्ट केली आहेत. “इराणची हवाई दल आणि त्यांची हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense System) आता पूर्णपणे निकामी झाली आहे. शत्रू आता बचावात्मक भूमिकेत आहे,” असे ट्रम्प यांनी अभिमानाने सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRIS Dena: अमेरिकेच्या ‘Torpedoचा डेडली अटॅक, Iranची ‘आयरिस डेना’ खाक; मात्र भारताचे INS Tarangini ‘असे’ ठरले इराणसाठी वरदान

तडजोडीसाठी इराणची विनंती?

ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला की, इराणचे नेतृत्व आता वारंवार वॉशिंग्टनशी संपर्क साधत आहे. “ते आम्हाला विचारत आहेत की आम्ही करार कसा करू शकतो? ते तडजोडीसाठी विनंती करत आहेत, पण आम्हाला सध्या तरी हा लढा तडीस न्यायचा आहे,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी इराणी राजदूतांना आणि नेत्यांना उद्देशून म्हटले की, जर त्यांना नवीन आणि प्रगत इराण हवा असेल, तर त्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा. ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराण खरंच बॅकफूटवर गेला आहे का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

US President Donald Trump said the United States will prioritize finishing the ongoing conflict with Iran before shifting attention to Cuba. Speaking during a White House event with Inter Miami CF, Trump said addressing Cuba would be “just a question of time.” Trump also said… pic.twitter.com/d408k3R9MI — IndiaToday (@IndiaToday) March 6, 2026

credit – social media and Twitter

क्युबावर “मैत्रीपूर्ण ताबा” मिळवण्याची योजना

इराणनंतर ट्रम्प प्रशासनाचे पुढचे लक्ष्य ‘क्युबा’ असेल. क्युबाच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तिथे “मैत्रीपूर्ण ताबा” (Friendly Takeover) मिळवण्याची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी माहिती दिली की, त्यांचे विश्वासू सहकारी मार्को रुबियो हे आधीच क्युबाच्या नेत्यांशी उच्चस्तरीय चर्चा करत आहेत. क्युबाने अमेरिकेच्या अटी मान्य कराव्यात आणि नवीन करारावर स्वाक्षरी करावी, यासाठी वॉशिंग्टन आता दबाव वाढवत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fuel Prices: ‘रशियाचा फायदा नाही, जगाचं हित!’ ट्रम्प यांनी भारताला रशियन तेलाच्या खरेदीसाठी दिली सूट; सवलतीमागे मोठे राजकारण

ओबामांच्या धोरणाला पूर्णपणे छेद

डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका बराक ओबामांच्या ‘क्युबा धोरणा’च्या अगदी उलट आहे. ओबामांनी क्युबाशी संबंध सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली होती, पण ट्रम्प यांनी सत्तेत येताच ते सर्व निर्णय फिरवले. क्युबावर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाचा शिक्का मारून त्यांनी पर्यटन आणि व्यापारावर कडक निर्बंध लादले आहेत. क्युबा व्हेनेझुएलाच्या डाव्या सरकारला मदत करत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. आता इराणनंतर क्युबाकडे वळण्याची घोषणा करून ट्रम्प यांनी संपूर्ण लॅटिन अमेरिकेत दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल कोणता मोठा दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी दावा केला की इराणची हवाई संरक्षण प्रणाली आणि हवाई दल पूर्णपणे नष्ट झाले असून, गेल्या ३ दिवसांत २४ इराणी जहाजे समुद्रात बुडवण्यात आली आहेत.

  • Que: इराणनंतर अमेरिकेचे पुढचे लक्ष्य कोणता देश आहे?

    Ans: इराणचा संघर्ष संपल्यानंतर अमेरिकेचे संपूर्ण लष्करी आणि राजनैतिक लक्ष क्युबा (Cuba) कडे वळवले जाईल.

  • Que: क्युबाबद्दल ट्रम्प यांची योजना काय आहे?

    Ans: क्युबाच्या आर्थिक दुरवस्थेमुळे तिथे नवीन करार करून "मैत्रीपूर्ण ताबा" मिळवण्याची आणि तिथल्या सरकारवर दबाव वाढवण्याची ट्रम्प यांची योजना आहे.

Web Title: Donald trump new foreign policy iran war and cuba takeover plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा
1

Middle East Conflict : मध्यपूर्व पुन्हा पेटलं! इराणचा अमेरिकन नौदल तळावर मोठा हल्ला; MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले
2

Apache Helicopter Crash : हेलिकॉप्टर क्रॅशनंतर अमेरिकेचा पलटवार? इराणवर अनेक ठिकाणांवर भीषण हल्ले

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार
3

Trump Warns Netanyahu : ‘मनमानी चालणार नाही ; ट्रम्प यांचा नेतन्याहूंना इराणशी युद्धावरुन सज्जड दम, साथ देण्यास दिला नकार

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका
4

H-1B Visa Update : भारतीयांना मोठा दिलासा! अमेरिकन कोर्टाने रद्द केली महागडी व्हिसा फी, ट्रम्प सरकारला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.