The auction of this rare red rock in America
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात बुधवारी (१६ जुलै) एक खास नीलामी होणार आहे. या नीलामीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या नीलामीमध्ये एक दुर्मीळ आणि अद्वितीय लाल, तपकिरी आणि राखाडी खडक विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. याची बोली तब्बल ३४ कोटींपासून सुरु होणार आहे. यामुळे ही नीलामी शास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे.
परंतु या खडकामध्ये असे विशेष काय आहे, की याची एवढी मोठी बोली लावली जात आहे. असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. तर हा कोणताही सामान्य खडक नसून, थेट मंगळावरुन पृथ्वीवर आलेला आहे. या खडकाचे वजन सुमारे २५ किलो म्हणजे ५४ पाऊंड आहे. याचे नाव NWA 16788 असे ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्मिळ लाल, तपकिरी आणि राखाडी रंगाच्या खडकाची नीलामी सोथबी घरामार्फत करण्यात येत आहे. या घराण्याच्या मते हा खड मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर आलेला आहे. हा आतापर्यंतचा मंगळ ग्रहावरील सर्वा मोठा खडक आहे. हा खडक सहारा वाळवंटात सापडला होता. यानंतर त्याची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, हा खडक यापूर्वी सापडलेल्या खडकाच्या तुलनेत ७०% मोठा आहे.
मंगळ ग्रहाशी संबंधित पृथ्वीवर उपल्बध असलेल्या सामग्रींपैकी ७% भाग या खडकाचा आहे.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, खगोलीय घटना घडली यावेळी हा खडक पृथ्वीवर आला असावा. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळ ग्रहावर एका मोठ्या क्षुद्रग्रहाच्या धडकेमुळे हा खटक तुटून १४ कोटी मैल अंतर पार करुन पृथ्वीवर पोहोचला आणि सहारा वाळवंटात कोसळला असावा. २०२३ मध्ये हा नायजरमध्ये सापडला होता.
या नीलामीचे आमखी एक आकर्षण म्हणजे सेराटोसॉरस नासिकॉर्निस या डायनासोरच्या हाडांचा सापळा देखील यामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या डायनासॉरची लांबी ११ फूट आणि उंची ६ फूट आहे. १९९६ मध्ये व्योमिंग USM मध्ये या डायनासॉरसचे अवशेष सापडले होते. त्यानंतर वैज्ञानिकांनी ते जोडून डायनासोरची कलाकृती तयार केली. हा सापळा ४० ते ६० लाख डॉलरपर्यंत विकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ही नीलामी शास्त्रज्ञ आणि खगोप्रेमी लोकांच्या आकर्षाचे कारण ठरत आहे.