Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिगारेटबाबत येथील सरकारने केले कठोर नियम; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट लाखोंचा दंड

मालदीवने सिगारेट आणि तंबाखू सेवनाबाबत एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १ नोव्हेंबर रोजी एक नवीन नियम लागू झाला, ज्यामध्ये २००७ किंवा त्यानंतर जन्मलेल्यांना तंबाखू उत्पादने खरेदी करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 10:12 PM
सिगारेटबाबत येथील सरकारने केले कठोर नियम (Photo Credit - X)

सिगारेटबाबत येथील सरकारने केले कठोर नियम (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • नियमांचे उल्लंघन केल्यास लाखोंचा दंड
  • ‘पिढीनुसार बंदी’ लागू करणारा मालदीव ठरला जगातील पहिला देश
  • नियमांचे उल्लंघन केल्यास लाखोंचा दंड

Maldives Cigarette Ban: सुंदर समुद्रकिनारे आणि शांत वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मालदीव देशाने आता सिगारेटबाबत एक अत्यंत कठोर आणि अनोखा नियम लागू केला आहे, ज्यामुळे या निर्णयाची जगभर चर्चा होत आहे. येथील सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर पिढीनुसार (Generation Wise) बंदी घातली आहे. मालदीवच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, १ नोव्हेंबरपासून हा नियम लागू करण्यात आला आहे.

नियम काय आहे?

मालदीव सरकारने सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांच्या खरेदी, वापर आणि विक्रीवर काही विशिष्ट लोकांसाठी संपूर्ण बंदी घातली आहे. कोणावर बंदी? १ जानेवारी २००७ किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला मालदीवमध्ये तंबाखू उत्पादने खरेदी करणे, वापरणे किंवा विकणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या जीवशैलीच्या सवयींमुळे मालदीवमध्ये गंभीर आरोग्य समस्या वाढत आहेत. त्यामुळे होणारे नुकसान सुधारण्यासाठी आणि आरोग्य खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mexico supermarket Massive fire : मेक्सिकोच्या सुपर मार्केटला भीषण आग..! आगीत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू; स्फोटामुळे मृतांची संख्या

नागरिक आणि पर्यटकांनाही नियम लागू

हा नियम केवळ मालदीवच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर येथे येणाऱ्या पर्यटकांनाही लागू होतो. वयाची खात्री नियमानुसार, एखाद्या व्यक्तीच्या वयाबद्दल शंका असल्यास, कागदपत्रे पाहून त्यांनी सिगारेट खरेदी किंवा वापरण्यासाठी नियमांनुसार पात्र आहेत की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. हा प्रतिबंध सर्व प्रकारच्या तंबाखू उत्पादनांवर लागू होतो. किरकोळ विक्रेत्यांना विक्री करण्यापूर्वी खरेदीदाराच्या वयाची पडताळणी करणे बंधनकारक आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास लाखोंचा दंड

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंडाची (Penalties) तरतूद करण्यात आली आहे:

  • नाबालिग व्यक्तीला तंबाखू उत्पादन विकल्यास: ५०,००० रुफिया (भारतीय चलनात सुमारे २ लाख ८४ हजार रुपये) दंड.
  • वेप (Vape) उपकरणांचा वापर केल्यास: ५,००० रुफिया (भारतीय चलनात सुमारे २८ हजार रुपये) दंड.

अशा प्रकारे पिढीनुसार सिगारेट किंवा तंबाखू उत्पादनांवर बंदी घालणारा मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे.

Nigeria US Relations: डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एकदा टाकली वादची ठिणगी; उडणार आणखी एका धार्मिक युद्धाचा भडका?

FAQs (संबंधित प्रश्न)

मालदीवमध्ये सिगारेटबाबत नवीन नियम कधीपासून लागू झाला?
हा नियम १ नोव्हेंबर पासून लागू करण्यात आला आहे.

या नियमांतर्गत कोणत्या लोकांवर तंबाखू उत्पादनांच्या विक्री आणि वापरासाठी बंदी आहे?
१ जानेवारी २००७ किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी मालदीवमध्ये तंबाखू उत्पादनांची खरेदी, वापर किंवा विक्री यावर बंदी आहे.

मालदीवने असा नियम लागू करण्यामागचे मुख्य कारण काय आहे?
मालदीवमध्ये तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या कमी करणे, यातून होणारे नुकसान सुधारणे आणि आरोग्याच्या देखभालीवरील खर्च कमी करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

हा नियम मालदीवच्या नागरिकांसोबत पर्यटकांवरही लागू होतो का?
होय, हा नियम देशाचे नागरिक आणि येथे येणाऱ्या पर्यटकांवरही लागू होतो.

नियमांचे उल्लंघन केल्यास किती दंड (जुर्माना) आकारला जाईल?
नाबालिग व्यक्तीला तंबाखू उत्पादन विकल्यास: ५०,००० रुफिया (सुमारे २ लाख ८४ हजार रुपये) दंड. वेप (Vape) उपकरणांचा वापर केल्यास: ५,००० रुफिया (सुमारे २८ हजार रुपये) दंड.

‘पिढीनुसार बंदी’ लागू करणारा मालदीव जगातील कितवा देश आहे?
पिढीनुसार सिगारेट किंवा तंबाखू उत्पादनांवर बंदी घालणारा मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे.

Web Title: The government here has made strict rules regarding cigarettes violation of the rules will result in a fine of lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 10:11 PM

Topics:  

  • international news
  • Maldives
  • smoking

संबंधित बातम्या

Nigeria US Relations: डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एकदा टाकली वादची ठिणगी; उडणार आणखी एका धार्मिक युद्धाचा भडका?
1

Nigeria US Relations: डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एकदा टाकली वादची ठिणगी; उडणार आणखी एका धार्मिक युद्धाचा भडका?

Tanzania election protest : निवडणुकीचा निकाल लागताच देश पेटला..! हिंसाचारातील 700 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?
2

Tanzania election protest : निवडणुकीचा निकाल लागताच देश पेटला..! हिंसाचारातील 700 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Israel and Hamas war: इस्रायल आणि हमासमध्ये आता ‘प्रेतयुद्धा’ची सुरूवात; 2 इस्रायली सैनिकांच्या बदल्यात ३० पॅलेस्टिनींचे मृतदेह
3

Israel and Hamas war: इस्रायल आणि हमासमध्ये आता ‘प्रेतयुद्धा’ची सुरूवात; 2 इस्रायली सैनिकांच्या बदल्यात ३० पॅलेस्टिनींचे मृतदेह

Heavy Rain in New York: न्यू यॉर्कमध्ये १० मिनिटात रेकॉर्डब्रेक पाऊस; विमानापासून वीजेपर्यंत अनेक सेवा विस्कळीत
4

Heavy Rain in New York: न्यू यॉर्कमध्ये १० मिनिटात रेकॉर्डब्रेक पाऊस; विमानापासून वीजेपर्यंत अनेक सेवा विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.