पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग; (photo - social media)
देशात सर्वत्र ‘डे ऑफ द डेड’ सण उत्सवात सुरु असताना त्याला या दुर्दैवी घटनेने गालबोट लावले. ‘डे ऑफ द डेड’ मध्ये कुटुंबीय व्यक्ती त्यांच्या पूर्वजांना आठवून त्यांच्या मिरवणुका काढतात. ज्यांची रंगबेरंगी सजावट केली जाते. मेक्सिकोच्या पारंपरिक सणाच्या कालावधीत ही दुर्घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सोनाराचे लोकप्रतिनिधी गुस्तावो सालास यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बहुतांश जणांचा मृत्यू हा विषारी वायूमुळे झाला असून शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांचा विषारी वायूमुळे श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तसेच, आगीच्या ज्वाला प्रचंड होत्या त्यामुळे संपूर्ण सुपर मार्केटमध्ये धूर पसरला होता. त्यामुळे मार्केटमध्ये अडकलेल्या ग्राहकांना श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळीवरील मृतदेहांचं परीक्षण सुरु आहे.
सुपर मार्केटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. परंतु, आगीचे मुख्य कारण काय याचा शोध सुरु आहे. हर्मोसिलो नगरपालिकेनं हा हल्ला दहशतवादी नव्हता, ही गोष्ट स्पष्ट केलीये. सोनारा राज्याचे राज्यपाल अल्फोंसो दुराजो यांनी या दुर्घटनेमागील खरे कारण शोधण्यासाठी सखोल तपास करायचे आदेश दिले आहेत. ही दुर्घटना दु:खद असून आम्ही मृत कुटुंबासोबत आहोत असे आश्वासन ही दिले. तसेच, पीडित कुटुंबियांबद्दल सोशल मीडियीवर सहवेदना शेअर केल्या आहे.
हेही वाचा : Nigeria US Relations: डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा एकदा टाकली वादची ठिणगी; उडणार आणखी एका धार्मिक युद्धाचा भडका?
मेक्सिको देशाच्या अध्यक्षा क्लाऊडिया शीबनाम यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत ‘या दुःखद दुर्घटनेत जवळच्या व्यक्तींना गमावणाऱ्या कुटुंबांसोबत सरकार असून, प्रशासनाची मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल‘ अशी एक्सवर पोस्ट केली आहे.
सोनारामधील रेड क्रॉसकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या टिममधील ४० सदस्य व १० रुग्णवाहिका बचावकार्य करण्यासाठी सहभागी झाल्या असून अग्निशमन दलाने पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच, स्फोटामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची शोधमोहीम सुरु आहे.






