Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण

South Korea dating : तरुणांमध्ये डेटिंग करणे सामान्य आहे. पण तुम्हाला माहित आहे का की असा एक देश आहे जिथे सरकार स्वतः तरुणांना डेटवर जाण्यासाठी पैसे देते. लग्न झाल्यावर ते मोठ्या प्रमाणात पैसे देखील देते?

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 24, 2025 | 02:43 PM
The government is paying 31 thousand rupees to date a lover If you get married you get 25 lakhs know the real reason

The government is paying 31 thousand rupees to date a lover If you get married you get 25 lakhs know the real reason

Follow Us
Close
Follow Us:
  •  दक्षिण कोरियामध्ये तरुणांना डेटवर जाण्यासाठी सरकार ३१ हजार रुपये देते, तर लग्न केल्यास २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे.
  •  कामाचा ताण आणि महागाईमुळे तरुण लग्नापासून दूर जात असल्याने दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये लोकसंख्या वेगाने घटत आहे, ज्याला रोखण्यासाठी सरकार अजब योजना राबवत आहे.
  • चीनने ३२ वर्षांनंतर प्रथमच कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांवर १३% कर लादला आहे, जेणेकरून लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन मिळेल.

South Korea dating allowance for youth : आजच्या धावपळीच्या युगात तरुणांना आपल्या करिअर आणि कामातून प्रेमासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, जगात असा एक देश आहे जिथे सरकार तरुणांना चक्क ‘डेटिंग’ करण्यासाठी पैसे देत आहे. इतकेच नाही, तर जर त्या डेटिंगचे रूपांतर लग्नात झाले, तर जोडप्याला चक्क २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षीस रक्कम दिली जात आहे. दक्षिण कोरिया (South Korea) आणि चीन (China) यांसारख्या आशियाई देशांमध्ये सध्या लोकसंख्येचे भीषण संकट ओढवले असून, ते रोखण्यासाठी या अजब योजना राबवल्या जात आहेत.

दक्षिण कोरिया: डेटिंग आणि लग्नासाठी पैशांचा पाऊस

दक्षिण कोरिया हा प्रगत देश असला तरी सध्या एका गंभीर सामाजिक संकटाचा सामना करत आहे. येथील तरुण कामात इतके व्यग्र आहेत की त्यांना वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच उरत नाही. वाढती महागाई आणि घरांच्या किंमतींमुळे तरुण लग्नापासून आणि मुले जन्माला घालण्यापासून दूर पळत आहेत. याचा परिणाम म्हणून देशाचा जन्मदर ऐतिहासिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे. हे संकट दूर करण्यासाठी दक्षिण कोरिया सरकारने तरुणांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा एखादे जोडपे डेटवर जाते, तेव्हा सरकार खर्चासाठी $350 (अंदाजे ३१,००० रुपये) देते. जोडप्यांनी एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवावा आणि त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचावे, हा यामागील उद्देश आहे. जर हे जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेते, तर त्यांना २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून ते आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय करू शकतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DOJ Release: Trump-Epsteinचे ‘डार्क’ कनेक्शन; ट्रम्पविरुद्ध महिलांवर अत्याचार अन् ‘Lolita Express’मध्ये प्रवासाचे धक्कादायक पुरावे

चीनमध्ये कंडोमवर ३२ वर्षांनंतर कर!

दुसरीकडे, जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहिलेला चीन आता लोकसंख्या घटण्याच्या भीतीने हादरला आहे. चीनमध्ये एकेकाळी ‘एक अपत्य’ धोरण होते, जे आता पूर्णपणे बदलून ‘तीन अपत्य’ धोरण करण्यात आले आहे. मात्र, तरीही जन्मदर वाढत नसल्याने चीन सरकारने एक कठोर पाऊल उचलले आहे. चीनने तब्बल ३२ वर्षांनंतर प्रथमच कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांवर १३% मूल्यवर्धित कर (व्हॅट) लादला आहे. १९९३ पर्यंत ही उत्पादने करमुक्त होती, कारण तेव्हा सरकारला लोकसंख्या नियंत्रणात ठेवायची होती. मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे. गर्भनिरोधक साधने महाग करून लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रवृत्त करणे, हा चीन सरकारचा यामागचा मुख्य उद्देश आहे.

BREAKING – South Korea’s birth rate has finally increased after the Government started paying $29000 in cash to couples who date and marry pic.twitter.com/xyxHV66T30 — Global UPDATES (@GlobalUpdates24) December 22, 2025

credit : social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’

करिअरचा दबाव आणि सामाजिक बदल

या दोन्ही देशांमधील परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, केवळ आर्थिक मदतीने लोकसंख्या वाढत नाही. दक्षिण कोरिया आणि चीनमधील तरुणांवर कामाचा इतका प्रचंड दबाव आहे की, त्यांना कुटुंब वाढवणे ही एक जबाबदारी किंवा ओझे वाटू लागले आहे. दक्षिण कोरियामध्ये मुलाच्या जन्मानंतरही सरकार मोठा आर्थिक भत्ता देते, तरीही लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. भविष्यात हे संकट केवळ या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दक्षिण कोरिया सरकार डेटिंगसाठी किती पैसे देते?

    Ans: दक्षिण कोरियामध्ये तरुणांना डेटिंगसाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकार सुमारे $350 (अंदाजे ३१,००० रुपये) खर्च देते.

  • Que: चीनमध्ये गर्भनिरोधक साधने महाग का झाली आहेत?

    Ans: चीनमधील घटता जन्मदर वाढवण्यासाठी सरकारने ३२ वर्षांनंतर प्रथमच कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांवर १३% कर लावला आहे.

  • Que: दक्षिण कोरियामध्ये लग्न केल्यावर किती आर्थिक मदत मिळते?

    Ans: जर एखादे जोडपे लग्नाचा निर्णय घेते, तर त्यांना सरकारकडून २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

Web Title: The government is paying 31 thousand rupees to date a lover if you get married you get 25 lakhs know the real reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • Dating terms
  • international news
  • marriage
  • South korea

संबंधित बातम्या

Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…
1

Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…

Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’
2

Vijay Mallya : विजय मल्ल्या म्हणाले, ‘फरार हा शब्द काढून टाका’; मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले, ‘आधी भारतात परत या’

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL
3

Bangladesh Violence : लक्ष्मीपूरमध्ये नरसंहार! घराला आग लावून पेटवून दिले; चिमुरडीचा आक्रोश विरला आगीत, VIDEO VIRAL

जागतिक नेत्यांच्या जीवाला लागलाय घोर; जेफ्री एपस्टाईनच्या फाईलने उलघडणार गुपित
4

जागतिक नेत्यांच्या जीवाला लागलाय घोर; जेफ्री एपस्टाईनच्या फाईलने उलघडणार गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.