
The three countries are forming a Joint Intervention Force to counter Turkish operations in the Eastern Mediterranean
Israel Greece Cyprus Joint Intervention Force 2025 : भूमध्य समुद्रातील राजकारण आता एका अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सातत्याने इस्रायलविरोधी (Israel) भूमिका घेतल्यामुळे आता पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तुर्कीला (Turkey) त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. इस्रायली वृत्तपत्र ‘ynet’ च्या दाव्यानुसार, इस्रायल, ग्रीस आणि सायप्रस या तिन्ही देशांनी मिळून एक ‘संयुक्त हस्तक्षेप दल’ (Joint Intervention Force) स्थापन करण्याची गुप्त योजना आखली आहे. ही युती तुर्कीच्या भूमध्य समुद्रातील महत्त्वाकांक्षांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल मानले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तुर्कीने सीरियाच्या माध्यमातून इस्रायलवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. आता इस्रायलने तुर्कीचा सर्वात कमकुवत बिंदू म्हणजेच पूर्व भूमध्य समुद्र निवडला आहे. ग्रीक माध्यमांनी दावा केला आहे की, हे नवीन लष्करी दल हवाई, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही स्तरांवर एकमेकांना मदत करेल. जरी इस्रायली अधिकाऱ्यांनी उघडपणे याला नकार दिला असला तरी, सूत्रांनुसार नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इस्रायल संरक्षण दलांना (IDF) प्राथमिक आराखडा तयार करण्याचे आदेश आधीच दिले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ
या लष्करी युतीचा मुख्य उद्देश केवळ तुर्कीला रोखणे नाही, तर पूर्व भूमध्य समुद्रातील नैसर्गिक वायू (Natural Gas) आणि तेल साठ्यांचे रक्षण करणे हा आहे. इस्रायलकडून युरोपला ऊर्जा पुरवण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या गॅस पाईपलाईनला तुर्कीचा तीव्र विरोध आहे. हे संयुक्त दल या पाईपलाईनला लष्करी संरक्षण देण्याचे काम करेल. तसेच, १९७४ च्या आक्रमणानंतर तुर्कीने व्यापलेल्या उत्तर सायप्रसच्या सागरी क्षेत्रातील मासेमारी आणि खनिज अधिकारांवरून सुरू असलेल्या वादातही हे दल सायप्रसची बाजू भक्कम करेल.
🚨 EASTERN MED UPDATE: Israel, Greece, and Cyprus are weighing a joint 2,500-troop rapid response force with air, sea, and land units. The goal: deter Turkey, protect energy infrastructure, and deepen strategic ties amid rising regional tensions.
Stay connected, follow @MOSSADil pic.twitter.com/9Q5EehYiMW — Mossad Commentary (@MOSSADil) December 18, 2025
credit : social media and Twitter
तुर्कीचे नौदल आणि भूदल ग्रीसपेक्षा मोठे आणि शक्तिशाली मानले जाते. मात्र, हवाई दलाच्या बाबतीत ग्रीसचा हात वरचढ आहे. आता यात इस्रायलचे अत्यंत प्रगत हवाई दल, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर कौशल्ये आणि मोसादची गुप्तचर क्षमता मिसळली, तर शक्ती संतुलन पूर्णपणे इस्रायल-ग्रीसच्या बाजूने झुकू शकते. इस्रायली लष्करी नियोजकांचा असा विश्वास आहे की, या युतीमुळे एर्दोगान यांना कोणतीही आक्रमक कारवाई करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh
ग्रीस आणि तुर्की यांच्यात एजियन समुद्रातील बेटांवरून अनेक दशकांपासून वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत ग्रीसने इस्रायलशी केलेली ही लष्करी युती एर्दोगान यांच्यासाठी मोठा राजनैतिक धक्का आहे. एर्दोगान स्वतःला इस्लामिक जगाचा ‘खलिफा’ म्हणून प्रस्थापित करू पाहत असताना, त्यांच्या शेजारील देशांनी इस्रायलशी हातमिळवणी करणे हे त्यांच्या प्रादेशिक वर्चस्वाला मोठे आव्हान देणारे ठरणार आहे.
Ans: हे तिन्ही देश पूर्व भूमध्य समुद्रात तुर्कीच्या कारवायांना रोखण्यासाठी एक 'संयुक्त हस्तक्षेप दल' (Joint Intervention Force) स्थापन करत आहेत.
Ans: तुर्कीच्या आक्रमक भूमिकेला रोखणे, नैसर्गिक वायू पाईपलाईनचे रक्षण करणे आणि सागरी क्षेत्रातील आर्थिक हितसंबंध जपणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Ans: इस्रायलच्या प्रगत हवाई दल आणि गुप्तचर क्षमतेमुळे तुर्कीची नौदलाची शक्ती कमकुवत पडू शकते, ज्यामुळे भूमध्य समुद्रातील त्यांचे वर्चस्व धोक्यात येईल.