
The US names China as its main enemy and India as a key partner
1.अमेरिका सर्वप्रथम शत्रू म्हणून चीनला घोषित करत आहे.
2.भारतास इंडो-पॅसिफिकमधील आणि जागतिक सुरक्षेत सर्वात महत्त्वाचा भागीदार मानण्यात आला आहे.
3. रशियाशी दीर्घकाळापासून असलेल्या संघर्षाबद्दल धोरणात्मक चूक मानली आहे आणि रशियाबरोबर स्थिर संबंध निर्माण करण्याची दिशा दाखवली आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या दिल्ली भेटीमुळे आशियातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, वॉशिंग्टनमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे, ज्यामुळे जागतिक भूराजकीय (Geopolitical) वातावरण तापले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने त्यांची बहुप्रतिक्षित नवीन राष्ट्रीय सुरक्षा रणनीती (NSS) जाहीर केली आहे. ३३ पानांच्या या अहवालाने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची आणि जागतिक रणनीतीची दिशा स्पष्टपणे मांडली आहे. या धोरणाचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत: चीनला ‘शत्रू नंबर १’ घोषित करणे, भारताला ‘सबसे महत्त्वाचा भागीदार’ मानणे आणि रशियासोबतच्या संघर्षाला ‘धोरणात्मक चूक’ म्हणून मान्य करणे.
हे NSS दस्तऐवज प्रत्येक राष्ट्राध्यक्ष वर्षातून एकदा जारी करतात आणि यातून अमेरिका जगात कोणती दिशा घेईल हे ठरवले जाते. नोव्हेंबर २०२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या या नवीन रणनीतीचा थेट आणि दूरगामी परिणाम भारत, चीन, रशिया आणि संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशावर होणार आहे, यात शंका नाही.
अमेरिकेच्या नवीन NSS रणनीतीनुसार, चीन आता अमेरिकेचे सर्वात मोठे आव्हान आणि मुख्य प्रतिस्पर्धी आहे. अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की चीन आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी क्षेत्रात अमेरिकेच्या हितांसाठी सर्वात मोठा आणि गंभीर धोका निर्माण करत आहे. चीनचे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढते वर्चस्व आणि दादागिरी रोखणे, हे अमेरिकेचे आता सर्वोच्च प्राधान्य असेल. या धोरणातून अमेरिकेने जगाला उघडपणे संदेश दिला आहे की, पुढचे संपूर्ण दशक हे अमेरिका आणि चीन यांच्यातील ‘शक्ती युद्ध’ (Power Struggle) असेल. चीनला रोखण्यासाठी अमेरिका कोणत्याही थराला जाऊ शकते, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : G7 Sanctions : भारतातून परतल्यावर संकटाचं वादळ पुतिन यांच्या डोक्यावर; G7-EUने रशियाविरुद्ध उभे केले युद्धाचे अदृश्य रणांगण
या रणनीतीत भारताला एक प्रमुख भू-राजकीय स्थान देण्यात आले आहे. अमेरिकेने भारताला इंडो-पॅसिफिक आणि जागतिक सुरक्षेतील ‘प्रमुख भागीदार’ म्हणून ओळखले आहे. अमेरिकेसाठी भारत हा आता केवळ एक बाजारपेठ किंवा मित्र नाही, तर चीनविरुद्ध एक मजबूत संतुलन (Strong Counterbalance) आहे. याचा अर्थ, संरक्षण, अत्याधुनीक तंत्रज्ञान (Technology Transfer) आणि पुरवठा साखळी (Supply Chains) मजबूत करण्यासाठी भारत-अमेरिका भागीदारी अधिक सखोल केली जाईल. भारताला क्वाड (QUAD), इंडो-पॅसिफिक सुरक्षा व्यवस्था आणि जागतिक व्यापारात केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. चीन-भारत-अमेरिका या त्रिकोणी भू-राजकीय समीकरणात पाकिस्तानची भूमिका वेगाने कमी होत आहे, ज्यामुळे साहजिकच पाकिस्तानला याचा सर्वाधिक त्रास होणार आहे.
अमेरिकेने या दस्तऐवजात सर्वात मोठा धोरणात्मक बदल करत एक महत्त्वपूर्ण कबुली दिली आहे. रशियासोबतचा दीर्घकाळचा संघर्ष किंवा कायमचे वैर ठेवणे, ही अमेरिकेची एक ‘धोरणात्मक चूक’ होती, असे मान्य केले आहे. चीनला रोखण्यासाठी रशियाला पूर्णपणे शत्रू बनवण्याचे धोरण आता अमेरिका बदलू इच्छित आहे. रणनीतीत रशियाशी संघर्ष कमी करून धोरणात्मक स्थिरता (Strategic Stability) प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. यामुळेच व्लादिमीर पुतिन यांची भारत भेट आणखी महत्त्वाची ठरते. आता अमेरिका, रशिया आणि भारत यांच्या संबंधांमध्ये एक नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. चीनच्या वाढत्या ताकदीसमोर, रशियाला आपल्या बाजूने ओढण्यासाठी अमेरिका दबाव कमी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आपणच सूर्य, बाकी सावल्या’ असं म्हणत Trumpने पुन्हा बढाया मारल्या; नोबेल पारितोषिक न मिळाल्याने अमेरिकेने देऊ केला ‘हा’ पुरस्कार
नवीन राष्ट्रीय सुरक्षा रणनीतीमध्ये अमेरिकेने आणखी एक मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. यापुढे अमेरिका सर्वत्र ‘जगाचे पोलीस’ (World’s Police) म्हणून भूमिका बजावणार नाही. अनावश्यक परदेशी युद्धे आणि हस्तक्षेप टाळले जातील. तथापि, जेथे अमेरिकेचे थेट राष्ट्रीय हितसंबंध धोक्यात येतील, तेथे मात्र अमेरिका शक्तिशाली आणि निर्णायक प्रतिसाद देईल. याचा अर्थ, अमेरिका आता अधिक धोरणात्मक वर्चस्वावर (Strategic Dominance) आणि कमी लष्करी हस्तक्षेपावर लक्ष केंद्रित करेल.
या बदलांमध्ये भारताचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. अमेरिकेच्या धोरणात्मक नकाशावर भारत आता एक ‘प्रमुख शक्ती’ म्हणून स्थापित झाला आहे. चीनला घेरण्याच्या अमेरिकेच्या धोरणात भारत ‘नंबर १’ चा भागीदार बनल्यामुळे, भारताला संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, रशियाला राजनैतिक स्थान मिळाले आहे. अमेरिका आता रशियासोबत स्थिर संबंधांची इच्छा उघडपणे व्यक्त करत असल्याने, भारत-रशिया संबंधांना बळकटी मिळेल आणि भारताला दोन्ही महासत्तांशी संतुलित संबंध राखणे सोपे होईल. या धोरणामुळे चीन सर्वाधिक नुकसानीत आहे, कारण आता दोन महासत्ता त्याला रोखण्यासाठी एकत्रित येत आहेत, तर पाकिस्तानची प्रादेशिक भूमिका झपाट्याने कमी होत आहे.
Ans: चीनला आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी क्षेत्रात अमेरिकेचा 'शत्रू नंबर १' आणि मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून घोषित केले आहे.
Ans: भारताला इंडो-पॅसिफिक आणि जागतिक सुरक्षेतील 'सबसे महत्त्वाचा भागीदार' म्हणून ओळखले आहे.
Ans: चीनच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी, रशियासोबतचा दीर्घकाळचा संघर्ष ही 'धोरणात्मक चूक' होती, हे अमेरिकेने मान्य केले आहे आणि आता स्थिरता आणण्याची गरज व्यक्त केली आहे.