Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक वर्षापुर्वीचा विध्वंस अजुनही सुरूच! युक्रेन रशिया युद्धानं कुणी नेमकं काय मिळवलं? तीन लाख लोकांचा मृत्यू, 63 लाख बेघर

युक्रेनमध्ये सामान्य जनजीवन ठप्प झालं असून लोक अजुनही बंकरमध्ये आसरा घेत आहेत. या युद्धामुळे किती विध्वंस झाला हे आपण काही आकडेवारीवरून समजू शकतो.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 24, 2023 | 12:07 PM
एक वर्षापुर्वीचा विध्वंस अजुनही सुरूच! युक्रेन रशिया युद्धानं कुणी नेमकं काय मिळवलं? तीन लाख लोकांचा मृत्यू, 63 लाख बेघर
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या वर्षी याच दिवळी युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला सुरुवात झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या युद्धाला (Ukraine Russia War ) आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या या भीषण युद्धाने युक्रेन या सुंदर देशाला उद्ध्वस्त केलं. या युद्धाने रशियाला काय मिळाले हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत असुन या युद्धामुळे मात्र युक्रेनला एका भयानक विध्वसं झालेला देश अशी ओळख मिळाली. या युद्धामुळे युक्रेनमध्ये लाखे  नागरिकांचा मृत्यू झाला तर कित्येक नागरिक बेघर झाले. नेमक्या या एक वर्षात काय झालं बघुया. 

[read_also content=”रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पुर्ण! दिसेल त्या गोष्टीवर ताबा मिळवत सुटला रशिया, युक्रेनने धैर्याने 6 हजार चौ.किमी क्षेत्र सोडवलं https://www.navarashtra.com/world/one-year-of-russia-ukraine-war-ukraine-successfully-freed-an-area-of-6000-sq-km-from-russias-control-nrps-371890.html”]

युद्धाचा परिणाम काय?

, हे या शब्दाचे अचूक उत्तर असू शकते. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंतची एकूण कामगिरी दिसून येत आहे. जरी रशियाने दावा केला की त्याने 4 प्रांत विलीन केले आहेत आणि झेलेन्स्कीचा दावा आहे की युक्रेनने आपला स्वाभिमान जपला आहे. पण सत्य हे आहे की युक्रेनियन जनता या युद्धात गवताप्रमाणे तुडवली गेली आहे. रशिया आणि पाश्चात्य देशांसाठी शक्ती संतुलनाचे साधन बनलेले हे युद्ध युक्रेनसाठी विनाशकारी ठरले आहे. स्वस्त वैद्यकीय शिक्षण, गव्हासारख्या अन्नधान्याची जागतिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या या देशात आजकाल सगळीकडे कचरा आणि गरिबी आहे.

सामान्य जनजीवन ठप्प 

युक्रेनमध्ये सामान्य जनजीवन ठप्प झालं असून लोक अजुनही बंकरमध्ये आसरा घेत आहेत. या युद्धामुळे किती विध्वंस झाला हे आपण काही आकडेवारीवरून समजू शकतो. या युद्धात आतापर्यंत 6900 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे, तर रशिया आणि युक्रेनच्या 2.8 लाख सैनिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाश्चात्य देशांच्या अंदाजानुसार रशियाचे १.८ लाख सैनिक युद्धात मारले गेले आहेत, तर १ लाख युक्रेनचे सैनिक युद्धभूमीतून जिवंत परतले नाहीत. याशिवाय युक्रेनमध्ये एकूण ६३ लाख लोक बेघर झाले आहेत. या लोकांना स्थलांतर करून देशातच काही ठिकाणी राहावे लागते किंवा ते पोलंड आणि जर्मनीसारख्या शेजारील देशांकडे वळले आहेत.

या युद्धामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विस्थापनाचे संकट निर्माण झाले आहे, असे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाचे म्हणणे आहे. मात्र, पोलंड आणि जर्मनीने विस्थापितांना जागा देण्याबाबत औदार्य दाखवले आहे. पोलंडने १.५ दशलक्ष आणि जर्मनीने दहा लाखांहून अधिक लोकांना आश्रय दिला आहे. एवढेच नाही तर या संकटाने युक्रेनियन लोकांनाही मोठ्या प्रमाणात गरिबीच्या दलदलीत ढकलले आहे. युक्रेनमधील 40 टक्के नागरिक मानवतावादी मदतीवर अवलंबून आहेत. याशिवाय ६० टक्के लोक गरिबीत जगत आहेत. त्याच वेळी, युक्रेनला 139 अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीतून सावरण्यासाठी युक्रेनला बराच वेळ लागू शकतो.

Web Title: Three lakh people died and 63 lakh people lost their home in ukraine russia war nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 12:07 PM

Topics:  

  • Ukraine Russia War

संबंधित बातम्या

Russia Ukraine war: युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या
1

Russia Ukraine war: युक्रेन-रशिया युद्धात महिलांचा लक्षणीय सहभाग; १ लाखांवर पोहोचली महिला सैनिकांची संख्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.