Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी

मनात भीती अन् डोळ्यात अश्रू; एल निनोच्या संकटातच तिबेटमध्ये ७.० रिश्टर तीव्रतेचा भयानक भूकंप झाला! रात्रीच्या गाढ झोपेत अवघ्या काही सेकंदांत ३०० हून अधिक घरे कोसळली अन् १६ जणांचा करुण अंत झाला. ४,८०० मीटर उंचावरील पर्वतांमध्ये हाहाकार माजवणारा तो काळरात्रीचा थरार नेमका कसा होता?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 09:08 AM
तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी

तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी

Follow Us
Follow Us:
  • तिबेट परिसरातील बाचेन काउंटीमध्ये ७.० रिश्टर तीव्रतेचा भूकंप.
  • भूकंपात १६ जणांचा मृत्यू , ३२ हून अधिक जण जखमी, तर ३०० हून अधिक घरे उद्ध्वस्त.
  • दुर्गम व अतिउंचावरील पर्वतीय भागात आपत्कालीन विभागाकडून बचावकार्य सुरू.
एकीकडे जागतिक पातळीवर वातावरणीय बदलांचे आणि एल निनोचे संकट असतानाच आता आशिया खंडात आणखी एक मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. भारताच्या सीमेलगत असलेल्या तिबेटच्या पठारी प्रदेशात ७.० रिश्टर तीव्रतेच्या भयानक आणि विनाशकारी भूकंपाने थरकाप उडवला आहे. गुरुवारी रात्रीच्या वेळी झालेल्या या भूकंपामुळे लोकांच्या किंचाळण्याने परिसर हादरून गेला. भीतीने लोकांनी घराबाहेर पळ काढला, मात्र काही क्षणांतच शेकडो संसार मातीमोल झाले. या भीषण आपत्तीत आतापर्यंत किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून ३२ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

रात्रीच्या अंधारात ३०० हून अधिक घरे कोसळली

स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री १० वाजून ३३ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या काही सेकंदांच्या धक्क्यांमध्ये ३०० हून अधिक घरे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या भूकंपामुळे अनेक कुटुंबांतील जवळची माणसे दगावली असून काही क्षणांत हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपाच्या भीषणतेमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

JUST IN: At least 16 dead, 32 injured and hundreds of homes collapsed after a magnitude 7.0 earthquake struck Tibet, China, officials say. https://t.co/2nTZ5BL4CU — Scope Report (@ScopeReport_) October 22, 2026

उत्तर तिबेटमधील नागचू ठरले भूकंपाचे केंद्रबिंदू

‘चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर’ आणि ‘अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण’ (USGS) संस्थेनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर तिबेटमधील नागचू परिसरातील बाचेन काउंटीच्या मारू टाउनशिपमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. हा भाग तिबेटची राजधानी ल्हासापासून सुमारे ३९० किलोमीटर ईशान्येला आहे. हा संपूर्ण परिसर समुद्रसपाटीपासून ४,८६४ मीटर अतिउंचावर आणि दुर्गम पर्वतीय भागात आहे. अत्यंत थंड हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मदत व बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी व ढिगारे हटवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती; आणीबाणीचा इशारा

शुक्रवारी पहाटेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी ११ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आपत्कालीन विभागाने संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केला असून बचाव पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही नागरिक दबले गेले असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून नुकसानीची अचूक व्याप्ती तपासण्याचे काम सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तिबेटमधील भूकंपाची तीव्रता किती होती आणि केंद्रबिंदू कुठे होता?

    Ans: भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर होती आणि केंद्रबिंदू उत्तर तिबेटमधील नागचू परिसरातील बाचेन काउंटीमध्ये १० किमी खोलीवर होता.

  • Que: या भूकंपात आतापर्यंत किती नुकसान झाले आहे?

    Ans: किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत, तसेच ३०० हून अधिक घरे कोसळली आहेत.

  • Que: मदत कार्यात कोणत्या अडचणी येत आहेत?

    Ans: भूकंपाचा भाग समुद्रसपाटीपासून ४,८६४ मीटर उंचावर व दुर्गम पर्वतात असल्याने आणि वीज-दूरसंचार सेवा खंडित झाल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

Web Title: Tibet 7 point 0 magnitude earthquake nagqu death toll news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • international news
  • latest news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: चीनच्या तिबेटमध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: चीनच्या तिबेटमध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप

बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक
2

बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर
3

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर

रत्नागिरीत मंत्र्यांचा PA असल्याचे भासवून फसवणूक? 5 हजार रुपये घेतल्याचा आरोप; खेडमध्ये गुन्हा दाखल
4

रत्नागिरीत मंत्र्यांचा PA असल्याचे भासवून फसवणूक? 5 हजार रुपये घेतल्याचा आरोप; खेडमध्ये गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.