Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक

बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग मनात ठेवून मेव्हण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. शैलेश मोरे यांची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आला होता, जेणेकरून हा प्रकार अपघात वाटावा. या प्रकरणातील मुख्य आरोपीला डोंबिवली जीआरपी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 20, 2026 | 04:10 PM
बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक

बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक

Follow Us
Follow Us:
  • घटस्फोटाच्या रागातून मेव्हण्याची हत्या
  • हत्या लपवण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर
  • २८ वर्षांनी मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत 

डोंबिवली : बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर टाकल्याच्या प्रकरणात तब्बल २८ वर्षांनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान १९९८ मध्ये घडलेल्या या हत्येप्रकरणी डोंबिवली जीआरपी पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कृष्णन याला बिहारमधून अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

१४ डिसेंबर १९९८ रोजी डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तपासादरम्यान मृत व्यक्ती शैलेश मोरे असल्याची माहिती समोर आली. त्यांचा मृत्यू अपघाती नसून हत्या झाल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मोरे यांनी संदीप कृष्णन याच्या बहिणीला घटस्फोट दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. याच रागातून संदीप कृष्णन आणि त्याचे दोन साथीदार विनोद यादव व विनेश कृष्णन यांनी पार्टीच्या बहाण्याने एकत्र येत शैलेश मोरे यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्या लपवण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर

हत्येनंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी शैलेश मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले. आरोपी फरार झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला मोठा कालावधी लागला. तब्बल २८ वर्षांनंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या जुन्या प्रकरणाला पुन्हा महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

हेही वाचा: ड्रिंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी ५ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल होताच एएसआय निलंबित

मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

डोंबिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संदीप कृष्णन याचा शोध घेत त्याला बिहारमधून अटक केली. अटकेनंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणातील विनोद यादव आणि विनेश कृष्णन हे अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून, त्यांनाही अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. २८ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्येतील मुख्य आरोपीला अटक झाल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. आता उर्वरित आरोपी कधी सापडतात आणि पुढील तपासात कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येमागचं कारण काय असल्याचा आरोप आहे?

    Ans: शैलेश मोरे यांनी आरोपीच्या बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणातील इतर आरोपी कोण आहेत?

    Ans: विनोद यादव आणि विनेश कृष्णन हे अन्य दोन आरोपी असून, त्यांचा शोध सुरू आहे.

  • Que: शैलेश मोरे यांचा मृतदेह कुठे आढळला होता?

    Ans: १४ डिसेंबर १९९८ रोजी डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह आढळला होता.

Web Title: Dombivli murder case main accused arrested after 28 years sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • dombivli crime case
  • latest news
  • murder case news

संबंधित बातम्या

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर
1

Transrail: ट्रान्सरेलला मोठी ऑर्डर; तब्बल ४१२ कोटींच्या नव्या कामांची भर

रत्नागिरीत मंत्र्यांचा PA असल्याचे भासवून फसवणूक? 5 हजार रुपये घेतल्याचा आरोप; खेडमध्ये गुन्हा दाखल
2

रत्नागिरीत मंत्र्यांचा PA असल्याचे भासवून फसवणूक? 5 हजार रुपये घेतल्याचा आरोप; खेडमध्ये गुन्हा दाखल

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा
3

प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरचा धक्कादायक कारनामा? अभिनेत्रीच्या मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत मोठा खुलासा

Accident News: दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
4

Accident News: दारूच्या नशेत भरधाव कार अन् दुचाकींना धडक; कोथरुडच्या एमआयटी रस्त्यावर नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.