Train Hijack Update 59 hostages still in the custody of Baloch rebels Know what happened in the last 24 hours
इस्लामाबाद: गेल्या 24 तासांपासून पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सरकारी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मीमध्ये चकमक सुरु आहे. मंगळवारी (11 मार्च) ला बंडखोर गट बलुच लिबरेशन आर्मीने (BLA)क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला करुन अपहरण केले आहे. या ट्रेनमध्ये जवळपास 500 प्रवासी होते. यामध्ये प्रवासी आणि पाकिस्तानी सुरक्षा सानिकांचाही समावेश होता. आतापर्यंत 30 बंडखोरांना खात्मा करण्यात आला आहे.
सध्या BLA ने वृद्ध, महिला आणि काही नागरिकांना सोडले असून 200 पेक्षा जास्त काही लोकांना ओलिस ठेवले आहे. यामध्ये बंडखोरांनी 20 हून सुरक्षा दलाच्या सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी बॉम्बने भरलेले आत्मघातकी जॅकेट परिधान केले आहेत. यामुळे प्रवाशांना वाचवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
गेल्या 24 तासांत काय काय घडले..
कैदेतून सुटलेल्यांच्या भावनिक प्रतिक्रिया
कैदेतून सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी स्फोटानंतर काय चालले आहे आम्हाला माहिती नाही, असे म्हटले. त्यांनी सांगितले की, लोकांच्या ओळखपत्र तपासण्यात आले. स्फोटानंतर गोळीबार झाला, आम्हाला जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. हे सर्व दृश्य अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकांच्या हत्येसाठी पाकिस्तान लष्कर जबाबदार- BLA
BLA ने एका निवेदनात म्हटले की आमच्या सैनिकांनी मश्काफ, धादर आणि बोलानमध्ये या कारवाईची योजना आखली होती. जाफर एक्सप्रेस ताब्यात घेतली आहे. प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. त्यांनी धमकी दिली आहे की, जर पाकिस्तानी लष्कराने किंवा सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर परिणाम होती. बंदी बनवलेल्या सर्व ओलिसांना मारण्यात येईल आणि या हत्यांची संपूर्ण जबाबादारी पाकिस्तान लष्कराची असेल.