
Taliban Official Mufti Noor Ahmad takes charge of Aghan embassy in delhi
पाकिस्तानचे दरवाजे बंद होताच तालिबानची भारताकडे धाव; उद्योग मंत्री अजीजी दिल्लीमध्ये
मुप्ती नूर अहमद हे तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे परराष्ट्र मंत्रालयाच्या राजकीय विभागाचे महासंचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांना एक अुभवी राजदूत म्हणून ओळखले जाते. २०२५ ऑक्टोबरमध्ये तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटत त्यांची दिल्लीतील दूतासाची धुरा सोपवण्यात आली होती.
भारत सध्या तालिबानला अफगाणिस्ताचे अधिकृत सरकारने म्हणून मान्यता दिलेली नाही. यामागचे कारण म्हणजे तालिबानने २०२१ मध्ये अशरफ घनी सरकारला जबरदस्तीने सत्तेवरुन काढून टाकले होते. परंतु भारचाने २०२२ मध्ये व्यावहारिक दृष्टीकोन स्वीकारत एक तांत्रिक मिशन सुरु केले आहे. भारत अफगाणिस्तानच्या विकासासाठी आणि तेथील लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहे. रशिया, चीन, पाकिस्तान आणि इतर काही आखाती देशांप्रमाणेच भारताने तालिबानला राजदूत पाठविण्याची परवानगी दिली आहे.
सध्या भारत काही स्तरावर अफगाणच्या तालिबान सरकारशी संबंध बनवून ठेवत आहेत. तसेच भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार संबंधासाठी देखील हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. खनिज, उर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात भारत अफगाणिस्तानसोबत संबंध प्रस्थापित करण्यावर भर देत आहे. यामुळे अफगाण-भारताला व्यापार आणि गुंतवणूकीसाठी नव्या संधी उपलब्ध होतील.
तसेत पाकिस्तान सरकार पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे देशाच्या विकासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भारत एक मोठी बाजारपेठ असून तो एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देखील ठरु शकतो. यामुळे अफगाणिस्तान भारतासोबत संबंध मजबूत करत आहे.
तालिबानला मान्यता देणार का भारत? काबूलमध्ये दुतावास पुन्हा सुरु झाल्याने चर्चांना उधाण