Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

US Midterms 2026 : ट्रम्प यांनी मेडिकेअर पार्ट बी च्या २०.८ दशलक्ष पात्र लाभार्थ्यांना ९० डॉलर्सच्या एक-वेळच्या देयकाची घोषणा केली आहे. ही रक्कम कोणाला मिळेल आणि कोणाला वगळले जाईल, हे जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 04, 2026 | 03:40 PM
Trump Medicare Part B 90 Dollars Donald Trump Truth Social Announcement

Trump Medicare Part B 90 Dollars Donald Trump Truth Social Announcement

Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी मदत
  • पात्रता आणि अटी स्पष्ट
  • मध्यावधी निवडणुकांपूर्वी राजकीय चर्चा

अमेरिकेतील (US Midterms 2026) राजकीय आणि आर्थिक वातावरणात सध्या एका मोठ्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील २०.८ दशलक्ष (सुमारे २.०८ कोटी) मेडिकेअर पार्ट बी च्या पात्र लाभार्थ्यांना ९० डॉलर्स (भारतीय चलनानुसार सुमारे ८,६६९ रुपये) ची एकरकमी रक्कम देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही रक्कम ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय विम्याच्या ऑक्टोबर महिन्याचा प्रीमियम भरण्यास मदत म्हणून दिली जाणार आहे.

ही आर्थिक मदत ‘मेडिकेअर इम्प्रूव्हमेंट फंड’मधून उपलब्ध करून दिली जात असून, अमेरिकन सरकारच्या मते यामुळे वृद्धांवर पडणारा आरोग्यसेवेचा अतिरिक्त आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. अमेरिकेत २०२६ मधील सर्वसाधारण मासिक मेडिकेअर पार्ट बी चा प्रीमियम २०२.९० डॉलर इतका आहे. त्यामुळे ९० डॉलरची ही मदत संपूर्ण प्रीमियम तर भागवणार नाही, परंतु ज्येष्ठ नागरिकांना ऑक्टोबर महिन्याच्या वैद्यकीय खर्चात नक्कीच मोठा दिलासा देईल.

कोणाला मिळणार फायदा आणि कोणाला केले जाईल वगळले?

ट्रम्प प्रशासनाने या ९० डॉलरच्या मदतीसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि निकष स्पष्ट केले आहेत. ही मदत सर्वांनाच समान पद्धतीने मिळणार नसून केवळ नियमांत बसणाऱ्या लाभार्थ्यांनाच दिली जाईल:

१. पात्र व्यक्ती: लाभार्थी अमेरिकेचा मूळ रहिवासी असावा आणि त्याने ‘ओरिजिनल मेडिकेअर पार्ट बी’चे सदस्यत्व घेतलेले असावे.

२. वगळलेले लाभार्थी: ज्या व्यक्ती ‘मेडिकेअर ॲडव्हान्टेज’ (Medicare Advantage) योजनेचा भाग आहेत, त्यांना या ९० डॉलरच्या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

३. उत्पन्न आणि इतर मदत: जे नागरिक मेडिकेडकडून (Medicaid) प्रीमियमसाठी आधीच सरकारी मदत घेत आहेत किंवा जे पार्ट बी वर उत्पन्नावर आधारित अतिरिक्त शुल्क (IRMAA) भरतात, ते देखील या मदतीसाठी पात्र असणार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

पैसे कधी आणि कसे जमा होणार?

पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही; ही रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे:

  • डायरेक्ट डिपॉझिट: ज्या लाभार्थ्यांची बँक खाती सरकारी यंत्रणेशी थेट जोडलेली आहेत, त्यांच्या खात्यात सुमारे ८ ऑक्टोबरपर्यंत ९० डॉलर थेट जमा (Direct Deposit) केले जातील.
  • टपालाने चेक: ज्यांच्याकडे थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची सोय नाही, अशा नागरिकांना ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात टपालाद्वारे त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर धनादेश (Check) पाठवला जाईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य

मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा

ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. ही घोषणा अमेरिकेतील आगामी मध्यावधी (Midterm) निवडणुकांच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी करण्यात आल्याने यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या अहवालानुसार, निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अनेक आर्थिक दिलासा योजनांपैकी ही एक प्रमुख घोषणा मानली जात आहे.

या व्यतिरिक्त, १८ वर्षांवरील प्रत्येक अमेरिकन नागरिकाला ५,००० डॉलर्स देण्याचा एक वेगळा प्रस्ताव ट्रम्प यांनी मांडला आहे, ज्याच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकी काँग्रेसची (Ssenate & House) मंजुरी आवश्यक असणार आहे. तसेच, ‘अफोर्डेबल केअर ॲक्ट’ (Affordable Care Act) अंतर्गत ज्यांनी अतिरिक्त पैसे भरले होते, त्यांना ५०० डॉलर्सचा परतावा स्वतंत्रपणे देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, या सर्व योजना ९० डॉलर्सच्या मेडिकेअर योजनेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

Web Title: Trump announces 90 dollar medicare part b payment for seniors hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elections
  • World news

संबंधित बातम्या

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
1

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी
2

Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी 7 मूर्तींची तोडफोड; परिस्थिती 2001 च्या भयावह हिंसेसारखी

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका
3

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका

Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य
4

Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.