Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता

Hillary Clinton On Trump : जर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कीव न सोडता रशिया-युक्रेन युद्ध संपवले तर ते नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवतील, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 16, 2025 | 09:07 AM
Trump deserves Nobel if he ends Ukraine war from Kiev says Hillary Clinton

Trump deserves Nobel if he ends Ukraine war from Kiev says Hillary Clinton

Follow Us
Close
Follow Us:

Hillary Clinton On Trump : अमेरिकेच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील वैर कोणाला लपलेले नाही. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी क्लिंटन यांचा पराभव केला होता आणि त्यानंतरपासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा सुरू आहे. मात्र आता रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करण्याऐवजी एक धाडसी विधान केले आहे. क्लिंटन यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले की  “जर ट्रम्प यांनी कीवमधील एकही भूभाग न सोडता रशिया-युक्रेन युद्ध संपवले, जर ते पुतिनविरुद्ध खंबीरपणे उभे राहू शकले, तर मी त्यांना स्वतः नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करेन.”

हे विधान विशेष ठरते कारण ट्रम्प स्वतः अनेक वेळा नोबेल शांतता पुरस्कारात रस दाखवून बसलेले आहेत. त्यांनी वारंवार म्हटले आहे की त्यांनी विविध देशांतील युद्ध रोखले आहे, त्यामुळे त्यांना शांततेचा नोबेल मिळायला हवा. मात्र यावेळी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेली क्लिंटनच अशी अट घालून आव्हान देत आहेत.

If Donald Trump negotiates an end to Putin’s war on Ukraine without Ukraine having to cede territory, I’ll nominate him for a Nobel Peace Prize myself. https://t.co/SYXKhhLqkS — Hillary Clinton (@HillaryClinton) August 15, 2025

credit : social media

अलास्कामधील पुतिन-ट्रम्प बैठक

ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच अमेरिकेतील अलास्का प्रांतात अँकोरेज शहरातील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे बैठक झाली. बैठकीच्या आधी ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमध्ये माध्यमांशी बोलताना आशा व्यक्त केली होती की ही बैठक “खूप चांगली” ठरेल. त्यांनी स्पष्ट केले होते  “मला लवकरात लवकर युद्धबंदी पाहायची आहे. मी या हत्याकांडाला थांबवण्यासाठी आलो आहे.” मात्र तीन तास चाललेल्या या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. युद्धबंदीवर शिक्कामोर्तब झाले नाही आणि रशिया-युक्रेन संघर्ष संपुष्टात आला नाही. अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नाही, त्यामुळे ही भेट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

ट्रम्पसाठी राजकीय संधी

जगातील सर्वात मोठा भू-राजकीय प्रश्न ठरलेले हे युद्ध जर ट्रम्प यांच्या प्रयत्नांतून थांबले, तर त्यांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्रचंड वाढेल. अमेरिकन राजकारणातही त्यांची प्रतिमा एका “शांतता स्थापक” नेत्याप्रमाणे उंचावेल. विशेष म्हणजे हिलरी क्लिंटनसारख्या कट्टर विरोधकांनीसुद्धा अशा परिस्थितीत त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्याची तयारी दर्शवली आहे. हे विधान अमेरिकन राजकारणातील एक नवे समीकरण उभे करते. जिथे दोन विरोधी ध्रुव मानले जाणारे नेते, एका गंभीर युद्धाच्या संदर्भात, संभाव्य सहमती दर्शवतात. क्लिंटन यांचे हे विधान राजकीय वैराच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय शांततेला प्राधान्य देणारे मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा

क्लिंटन यांच्या विधानामुळे चर्चेला नवे वळण

सध्या युद्धबंदीबाबत काहीही ठोस निकाल लागलेला नसला, तरी क्लिंटन यांच्या विधानामुळे चर्चेचे नवे वळण मिळाले आहे. अमेरिकन जनतेपासून ते जागतिक स्तरावरील राजकीय विश्लेषकांपर्यंत, सर्वांचे लक्ष आता ट्रम्प यांच्या पुढील पावलांकडे लागले आहे. जर ट्रम्प यांनी खरोखरच हे युद्ध संपवले, तर त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो – आणि हेच कदाचित त्यांच्या राजकीय पुनरागमनाचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल

Web Title: Trump deserves nobel if he ends ukraine war from kiev says hillary clinton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • international politics
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
1

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
2

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट
3

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
4

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.