Trump enters FIFA Club World Cup final crowd erupts in chaos watch video
Trump booed Club World Cup final : न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये पार पडलेल्या FIFA Club World Cup 2025 च्या अंतिम सामन्यात अनपेक्षित क्षण घडला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह जेव्हा सामन्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झाले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये गोंधळाची लाट उसळली. काहींनी त्यांचे जोरदार स्वागत केले, तर काहींनी टाळ्यांऐवजी शिट्ट्यांचा गोंगाट केला. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
पीएसजी आणि चेल्सी यांच्यातील हाय-वोल्टेज अंतिम सामना पाहण्यासाठी ट्रम्प स्टेडियममध्ये पोहोचले, तेव्हा सुरुवातीला प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्यांनी स्वागत केले. पण राष्ट्रध्वजाला सलामी देताना जेव्हा ट्रम्प यांचा चेहरा जंबोट्रॉन स्क्रीनवर झळकला, तेव्हा वातावरण अचानक बदलले. प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात शिट्ट्या आणि हूटिंग करत नाराजी व्यक्त केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्राझीलने भारताला दिला मोठा झटका! ‘Akash Missile System’ची खरेदी रद्द; काय आहे कारण?
योगायोग असा की, याच दिवशी म्हणजे १४ जुलै २०२४ रोजी, ट्रम्पवर पेनसिल्व्हेनियामधील एका निवडणूक प्रचारसभेत गोळीबार झाला होता. त्यांच्या डाव्या कानातून गोळी गेली होती आणि सुदैवाने त्यांचा जीव वाचला होता. या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनवला आहे.
🚨BREAKING: Loud boos ERUPT the moment Donald Trump appears on the Jumbotron during the National Anthem at the World Cup Final. The camera cut away almost instantly. The world is watching and MAGA is crumbling. pic.twitter.com/oh5UqrYqZj
— Charles (@charlesera58193) July 14, 2025
credit : social media
अलीकडच्या आठवड्यांमध्ये अमेरिकन राजकारणात जेफ्री एपस्टाईन फाइल्स वाद, इमिग्रेशन धोरण, आणि टॅरिफ पॉलिसीज यामुळे ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प पाम बोंडी, डॅन बोंगिनो, क्रिस्टी नोएम आणि टॉम ब्रॅडी यांच्यासह एका खासगी कार्यक्रमात दिसले होते.
या पार्श्वभूमीवर, राजकीय कार्यकर्त्या लॉरा लूमर आणि इतरांनी ट्रम्पवर बोंडीचे संरक्षण करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ट्रम्पविरोधी भावना पुन्हा उफाळून आल्या आहेत. याआधीही २०१९ च्या वर्ल्ड सिरीज गेम आणि २०२१ च्या बॉक्सिंग इव्हेंटमध्ये ट्रम्प यांना अशाच प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
विशेष म्हणजे, २०२६ मध्ये होणाऱ्या FIFA World Cup Final चाही सामना याच MetLife Stadium मध्ये होणार आहे. त्यामुळे हा स्टेडियम राजकारण आणि खेळ यांची सांगड घालणारे केंद्र बनले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत चीन बैठक ठरणार निर्णायक! ‘या’ मुद्यांवर निर्णय होण्याची शक्यता, पाहा भेटीची पहिली झलक
या घटनेचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी ट्रम्पला “स्वातंत्र्याचा आवाज दाबणारे नेते” असे म्हटले, तर काहींनी “ते अजूनही जनतेच्या लक्षात आहेत” अशा शब्दांत त्यांचे समर्थन केले.