
US Venezuela Tension
अमेरिकेने व्हेनेझुएलावर दबाव निर्माण करत चीन, रशिया, इराण आणि क्यूबासोबचे सर्व आर्थिक संबंध संपवण्यास सांगितले आहे. तरच व्हेनेझुएलाच्या साठ्यातून अधिक तेल काढण्याची परवानगी मिळेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, व्हेनेझुएलाने फक्त अमेरिकन कंपन्यांशी तेल कंपन्याशी भागीदारी करावी आणि कच्चे तेल अमेरिकेला विकावे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या सर्वात क्रूर तुरुंगात मादुरो
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांनी सध्या अमेरिकेच्या MDC तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हे अमेरिकेचे सर्वात क्रूर आणि भयानक तुरुंग मानले जाते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनी देखील या तुरुंगात कैद करण्यात आले आहे.
दरम्यान दुसरीकडे व्हेनेझुएलात उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाची सत्ता हाती घेतली आहे. परंतु या अंतरिम सरकारसमोर आला देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला व्हेनेझुएलाची परिस्थिती अनिश्चित झाली आहे. ट्रम्प यांना येथील तेल साठ्यांवर नियंत्रण मिळाल्यास ही परिस्थिती रशिया, चीनच्या प्रभावासाठी धोकादायक मानली जात आहे. यामुळे सध्या जगातिक शक्तींमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा तेल भागीदार हा चीन आहे. परंतु चीनचे येथील अस्तित्व धोक्यात आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला रशिया, चीन, क्यूबा, इराणशी असलेल्या आर्थिक संबंध तोडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे सध्या जागतिक स्तरावर व्हेनेझुएलाचे अंतरिम सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.