
trump greenland dispute denmark mp anders vistisen go to hell comment 2026
जगातील सर्वात मोठे बेट असलेल्या ‘ग्रीनलँड’ (Greenland) वरून अमेरिका आणि युरोपीय देशांमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ग्रीनलँड बळकावण्याच्या हट्टापायी ट्रान्सअटलांटिक संबंधांमध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. युरोपियन संसदेत या विषयावर चर्चा सुरू असताना डॅनिश खासदार अँडर्स व्हिस्टिसन (Anders Vistisen) यांनी वापरलेल्या भाषेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
मंगळवारी युरोपियन संसदेच्या अधिवेशनादरम्यान अँडर्स व्हिस्टिसन यांनी ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांचा समाचार घेतला. ट्रम्प यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांनी ग्रीनलँडला ‘अमेरिकन टेरिटरी’ म्हणून दाखवले होते. यावर संताप व्यक्त करताना व्हिस्टिसन म्हणाले, “मी तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो, मिस्टर प्रेसिडेंट, नरकात जा!” (Mr. President, Go to Hell). संसद उपाध्यक्षांनी त्यांना ही भाषा असंसदीय असल्याचे सांगून अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र व्हिस्टिसन यांनी डेन्मार्कच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Trade: भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा; रशियन तेलाच्या मुद्द्यावर ‘या’ देशाला शिकवणार धडा
वादाची ठिणगी पडली ती ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) वरील एका पोस्टमुळे. ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनवलेला एक नकाशा शेअर केला, ज्यामध्ये कॅनडा, व्हेनेझुएला आणि ग्रीनलँड हे अमेरिकेचे भाग असल्याचे दाखवले गेले. इतकेच नाही तर, ट्रम्प स्वतः उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासह ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा झेंडा रोवताना दिसत आहेत. यावर “Greenland US Territory Est. 2026” असे कॅप्शन देण्यात आले होते. या कृत्याला युरोपीय नेत्यांनी ‘नवे वसाहतवाद’ (New Colonialism) म्हटले आहे.
#BREAKING: Danish MEP abuses Trump inside European Parliament over Greenland. Danish MEP Anders Vistisen bluntly tells US President Donald Trump “f**k off” in European Parliament over renewed U.S. demands to forcibly take control of Greenland. pic.twitter.com/UfwOzKPDYB — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 20, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प केवळ विधानांवर थांबलेले नाहीत, तर त्यांनी आर्थिक दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जाहीर केले की, जर डेन्मार्क आणि इतर युरोपीय देशांनी ग्रीनलँडबाबत अमेरिकेला सहकार्य केले नाही, तर १ फेब्रुवारी २०२६ पासून त्यांच्यावर १०% आयात शुल्क लादले जाईल. १ जून पर्यंत करार न झाल्यास हे शुल्क २५% पर्यंत वाढवण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. यात डेन्मार्कसह नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, नेदरलँड्स आणि फिनलँड या देशांचा समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS2026: जागतिक सत्तेचे नवे केंद्र! रशिया, भारत आणि चीन एकत्र येऊन ट्रम्पच्या दादागिरीला देणार उत्तर; RIC होणार पुन्हा सक्रिय?
ट्रम्प यांचा असा दावा आहे की, रशिया आणि चीनच्या आर्क्टिक प्रदेशातील वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या या बेटावर अमेरिकेचा आधीच लष्करी तळ (Pituffik Space Base) आहे, मात्र ट्रम्प यांना या बेटाचा संपूर्ण ताबा हवा आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, “ग्रीनलँड विक्रीसाठी नाही.”
Ans: ग्रीनलँड हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिकेजवळ असला तरी तो 'किंगडम ऑफ डेन्मार्क' मधील एक स्वशासित (Autonomous) प्रदेश आहे.
Ans: ट्रम्प यांनी १ फेब्रुवारी २०२६ पासून १०% आणि १ जून पासून २५% आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे, जर त्यांनी ग्रीनलँडच्या विलीनीकरणाला विरोध केला तर.
Ans: त्यांनी ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील दाव्याचा निषेध करत त्यांना "नरकात जा" (Go to hell) असे अत्यंत तीव्र शब्दांत सुनावले.