ट्रम्पविरुद्ध रशिया, चीन आणि भारत एकत्र येतील का? आरआयसीच्या लाँचिंगवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Sergey Lavrov annual press conference 2026 : जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत जगातील अनेक देशांना व्यापार आणि शुल्काच्या मुद्द्यावरून धमकावण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे रशियाने या ‘दादागिरी’ला उत्तर देण्यासाठी आपला जुना आणि शक्तिशाली पत्ता बाहेर काढला आहे. रशियाचे अनुभवी परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी त्यांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ‘आरआयसी’ (Russia-India-China – RIC) त्रिपक्षीय संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
‘आरआयसी’ हा रशिया, भारत आणि चीन या तीन अण्वस्त्रधारी महासत्तांचा गट आहे. लावरोव्ह यांच्या मते, हा गट केवळ संवादाचे माध्यम नसून तो ‘ब्रिक्स’ (BRICS) आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने पाया आहे. २०२० मधील गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर हा संवाद थंडबस्त्यात पडला होता. मात्र, ऑक्टोबर २०२४ मधील कझान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर आता रशियाला या तीन देशांनी पुन्हा एका व्यासपीठावर येणे काळाची गरज वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Summit: ‘माझ्या भावाचे स्वागत!’ UAEअध्यक्षांसाठी PM Modi नी तोडला प्रोटोकॉल; दोन तासांच्या भेटीत झाला ऐतिहासिक ‘पावर’ गेम
रशियाने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त दंडात्मक शुल्क लादले असून, भारतासाठी एकूण सीमा शुल्क आता ५०% वर पोहोचले आहे. केवळ भारतच नाही, तर ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याच्या त्यांच्या हट्टाला विरोध करणाऱ्या नाटो (NATO) मित्रदेशांनाही शुल्काची धमकी दिली आहे. या जागतिक आर्थिक अस्थिरतेत रशियाला भारत आणि चीनची साथ हवी आहे.
🚨🇷🇺 Foreign Minister Lavrov on what’s next for the world order ▪️A multipolar world is taking shape. ▪️The Russia–India–China (RIC) triangle still exists. ▪️RIC laid the groundwork for BRICS. https://t.co/GnsXQ2CuVI pic.twitter.com/qAsMB393BE — Sputnik India (@Sputnik_India) January 20, 2026
credit – social media and Twitter
लावरोव्ह यांनी गेल्या डिसेंबर २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीचा विशेष उल्लेख केला. भारत आणि रशियामधील वार्षिक शिखर परिषदेत पाच वर्षांचा आर्थिक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. रशियासाठी भारत हा केवळ एक ग्राहक नसून एक ‘विश्सार्ह धोरणात्मक भागीदार’ आहे. “युरेशिया आणि जगाच्या विकासासाठी मॉस्कोचे चीनशी असलेले संबंध अभूतपूर्व खोलीवर पोहोचले आहेत, आणि आता भारताला या प्रक्रियेत पूर्ण ताकदीने सामील करण्याची आमची इच्छा आहे,” असे लावरोव्ह यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: मध्य-पूर्वेत वादळापूर्वीची शांतता! Iran-US रणभूमीच्या दिशेने; आकाशात B-2 Stealth, समुद्रात ‘USS अब्राहम लिंकन’ची धडक
ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, जेणेकरून रशिया किंवा चीन तिथे पाय रोवू शकणार नाहीत. यावर भाष्य करताना लावरोव्ह यांनी स्पष्ट केले की, रशियाचा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचा कोणताही विचार नाही. मात्र, अमेरिकेच्या अशा विस्तारवादी धोरणांना उत्तर देण्यासाठी आशियाई महासत्तांचे एकत्र येणे जागतिक समतोलासाठी अनिवार्य आहे.
Ans: आरआयसी म्हणजे रशिया (Russia), भारत (India) आणि चीन (China) या तीन देशांचा त्रिपक्षीय संवाद गट, ज्याची स्थापना १९९० च्या दशकात करण्यात आली होती.
Ans: अमेरिकेने (ट्रम्प प्रशासन) लादलेले व्यापार शुल्क आणि जागतिक वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नांना उत्तर देण्यासाठी रशियाला आशियाई महासत्तांची एकजुट हवी आहे.
Ans: रशियन तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर २५% दंडात्मक शुल्क लादले आहे, ज्यामुळे भारतावरील एकूण अमेरिकन शुल्क ५०% वर पोहोचले आहे.






