Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत राजकीय वादळ! इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षण मंत्र्यांना धरले जबाबदार; “तेच म्हणाले, हे करूया’…”

डोनाल्ड ट्रम्प यांनी या संपूर्ण संघर्षाची जबाबदारी थेट आपले संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यावर ढकलली आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे युद्धाच्या निर्णयाबाबत प्रशासकीय स्तरावर मतभेद असल्याचे दिसत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 05:04 PM
इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षण मंत्र्यांना धरले जबाबदार (Photo Credit- X)

इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षण मंत्र्यांना धरले जबाबदार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत राजकीय वादळ!
  • इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संरक्षण मंत्र्यांना धरले जबाबदार
  • “तेच म्हणाले, ‘चला, हे करूया’…”
Donald Trump on Iran: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेत मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या संपूर्ण संघर्षाची जबाबदारी थेट आपले संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यावर ढकलली आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळे युद्धाच्या निर्णयाबाबत प्रशासकीय स्तरावर मतभेद असल्याचे संकेत मिळत असून, जागतिक राजकारणात नवी चर्चा छेडली गेली आहे.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी अत्यंत नाट्यमयरीत्या या युद्धाच्या निर्णयाचा उलगडा केला. “इराणविरुद्ध लष्करी कारवाईचा प्रस्ताव सर्वात आधी पीट हेगसेथ यांनीच मांडला होता. इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखण्यासाठी आपण आताच पाऊल उचलले पाहिजे, असा आग्रह हेगसेथ यांनी धरला होता,” असे ट्रम्प यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, ट्रम्प हे विधान करत असताना संरक्षणमंत्री हेगसेथ त्यांच्या शेजारीच उभे होते.

Trump on Iran: Pete Hegseth was the first one to speak up. He said, “Let’s do it.” pic.twitter.com/Wuld1wxIT0 — Clash Report (@clashreport) March 23, 2026

या निर्णयाच्या क्षणाचे वर्णन करताना ट्रम्प पुढे म्हणाले, “मी पीट यांना फोन केला, जनरल केन यांना फोन केला आणि माझ्या प्रशासनातील महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली. मध्य-पूर्वेतील ही मोठी समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे दोनच पर्याय होते- एक तर परिस्थिती गंभीर होण्याची वाट पाहणे किंवा थेट हस्तक्षेप करून या समस्येचे मूळ उपटून टाकणे.”

US Iran Ceasefire Talks : ट्रम्प यांचे ‘डबल स्टँडर्ड’! एकीकडे शांततेच्या बाता दुसरीकडे तेहरानवर बॉम्बवर्षाव, इराण भडकला

युद्धाच्या निर्णयावरून प्रशासनात पेच?

इराणसोबतच्या या युद्धाला आता चार आठवडे पूर्ण होत आहेत. मात्र, सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी अनिवार्य वाटणारे हे युद्ध आता राजकीय वादात अडकले आहे. इराणने आखाती देशांमध्ये केलेल्या प्रतिहल्ल्यांमुळे अमेरिका काहीशी बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. हे हल्ले अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याचे खुद्द ट्रम्प यांनीच मान्य केले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्तपणे ही मोठी लष्करी मोहीम सुरू केली होती. इराणची लष्करी क्षमता मोडीत काढणे आणि त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले होते.

ट्रम्प प्रशासनातील अंतर्गत मतभेद उघड

ट्रम्प यांच्या ताज्या विधानामुळे प्रशासनातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या युद्धाबाबत सरकारमध्ये दोन प्रवाह दिसत आहेत. इस्रायल इराणवर हल्ला करणारच होता, त्यामुळे अमेरिकेचा हस्तक्षेप अनिवार्य होता, असा या गटाचा दावा आहे. तसेच, इराण अण्वस्त्रे तैनात करण्याच्या अगदी उंबरठ्यावर होता, त्यामुळे युद्ध सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे या गटाचे मत आहे. संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी यापूर्वी अनेकदा ‘अमेरिकेचे उद्दिष्ट स्पष्ट आहे’ असे म्हटले होते. मात्र, आता ट्रम्प यांनी या निर्णयाचे खापर हेगसेथ यांच्यावर फोडल्याने, आगामी काळात अमेरिकेच्या संरक्षण धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर युद्धाचे सावट

या युद्धामुळे केवळ राजकीयच नव्हे, तर जागतिक आर्थिक स्तरावरही गंभीर परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मध्य-पूर्वेतील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातही या युद्धाच्या खर्चावरून आणि निर्णयावरून बायडेन समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

Donald Trump चा यु-टर्न! IRGC ला फसवले, खाडीत सेटिंग, F-35, B2 बॉम्बर्समध्ये व्यवस्था

Web Title: Trump held the defense secretary responsible for the attack on iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.