Trump makes sensational claims Thailand and Cambodia countries have agreed to a ceasefire.
वॉशिंग्टन: थायलड आणि कंबोडियामध्ये सध्या चार दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत ३३ जणांचा बळी गेला आहे. दोन्ही देश एकमेकांवर तीव्र गोळीबार करत आहेत. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने यामध्ये हस्तक्षेपण करत युद्धबंदीची इशारा दिला आहे.
भारत-पाकिस्तान, इस्रायल-इराण नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थायलंड आणि कंबोडियात युद्धबंदीची दावा केला आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, थायलंड आणि कंबोडियाच्या नेत्यांनी तात्काळ युद्धबंदीच्या चर्चेवर सहमती दर्शवली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानाच्या युद्धबंदीचे देखील श्रेय पुन्हा एकदा घेतले आहे.
स्कॉटलैंड दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी सोश मीडियावर थायलंड आणि कंबोडियाच्या संघर्षावर भाष्य केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे ती, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सीमा वाद सुरु असाताना मी दोन्ही देशांशी थेट चर्चा केली आहे. दोन्ही देशांना मी तात्काळा युद्धबंदीचे आवाहन केले असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, असे न केल्यास अमेरिका त्यांच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही.
ट्रम्प यांनी म्हटले की, “दोन्ही बाजूंनी तात्काळ युद्धबंदी आणि शांततेसाठी सहमती दर्शवली आहे. मी कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट आणि थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमखम वेचायचाई यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे.”
याच वेळी थायलंडच्या कार्यवाहक पंतप्रधान फुमथम यांनी आभार मानले आणि थायलंड युद्धबंदीसाठी तयार असल्याचे सांगितले परंतु कंबोडियाने याचे उल्लंघन करु नये असेही त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यंनी म्हटले की, दोन्ही देशांनी तात्काळी शांतता प्रस्थापित केल्यास, अमेरिका दोन्ही देशांसोबत व्यापारा करार अंतिम टप्प्यात नेण्यास उत्सुक असले. मात्र संघर्ष सुरुच राहिला तर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. ट्रम्प यांनी युद्धबंदीवर इतर कोणतीही माहिती दिली नाही. तसेच व्हाइट हाऊस किंवा अमेरिकेच्या इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती दिली नाही. यामुळे ट्रम्प यांच्या थायलंड आणि कंबोडियातील युद्धबंदीच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या या संघर्षात मृतांचा आकडा ३३ पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कंबोडियाचे १३ सैनिक ठार झाले आहे. तर ७१ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. याच वेळी थायलंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ नागरिकांचा आणि ६ सैनिकांचा समावेश आहे. दोन्ही देश एकमेकांवर जाणूनबुजून हल्ला केल्याचा आरोप करत आहेत.