सुद्राच्या कुशीत वसलेले बौद्ध राष्ट्र कसे बनले इस्लामिक? जाणून घ्या यामागची रंजक कहाणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा भारत आणि मालदीवच्या वाढत्या संबंधासाठी अत्यंत महत्वाच आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर सहकर्य वाढवण्यावर चर्चा होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, इस्लामिक राष्ट्र असलेला मालदीव पूर्वी बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखला जात होता. यामागे देखील अगदी मनोरंजक काहाणी आहे. आज आपण ही काहाणी जाणून घेणार आहोत.
आज हे सुदंर द्वीप त्याच्या स्वच्छ समुद्रकिनारे आणि आलिशान रिसॉर्टसाठी ओळखले जाते. परंत या बेटावर ८९६ वर्षापूर्वी बौद्ध धर्माचा प्रभावा होता. येथे बौद्ध धर्माला मुख्य स्थान दिले जायचे. आजाही या बेटावर बौद्ध स्तूप आणि मंठांचे अवशेष सापडतात. हे अवशेष इस. पूर्व तिसऱ्या शकताकील बौद्ध वारशाचे प्रतिबिंब दर्शवते. मालदीवमझध्ये बौद्धधर्म तिसऱ्या शतकात स्थापित झाला होता.
१२ व्या शतकात अबू बल-बरकत युसूफ उल बारबारी नावाचा एक इस्लामिक विद्वान मालदीवमध्ये आले. त्यांच्या मालदीवमध्ये आल्यानंतर देशाची सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय दिशा पूर्णत: बदलली. त्यांनी मालदीवचे तत्कालीन राजा धोवेमी यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रेरित केले.
यानंतर मालदीवचे सर्व शासन, मालदीवच्या संस्कृती आणि समाजव्यवस्थेत बदल झाला. धोवेमी राजाने अबू बल-बरकत युसूफ उल बारबारी यांच्या विचाराने प्रेरित होऊन इस्लाम धर्म स्वीकारला. तेव्हापासून त्यांना सुलतान मुहम्मद अल-आदिल म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर पूर्ण देशात हळहळू इस्लाम धर्माचा प्रसार होऊ लागला.
मालदीवमध्ये शरिया कायद्याच्या आधारावर नवीन न्यायव्यवस्थेची स्थापन करण्यात आली. याच कायद्यानुसार आजही देशाचा सर्व व्यवहार चालतो. त्यानंतर अनेक शतके मालदीवमध्ये इस्लामिक धर्माचा प्रासर झाला. १९६८ मध्ये मालदीव प्रजासत्ताक बनले. आजही मालदीवला इस्लाम राज्य म्हणून ओळखले जाते.
मालदीव आजही धार्मित आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करते. सध्या हे एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. याठिकाणी मशिदी प्रार्थनास्थळे नाहीत, तर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुस्लीम धर्मीयांचे हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आजही येथे पारंपारिक इस्लामिक जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाते.