Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump-Munir Meet : डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची खास भेट; बंद पेटीच्या भेटवस्तूमध्ये नेमकं दडलंय काय?

Trump-Munir Meet : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कप्रमुख असीम मुनीर यांनी व्हाइट हाउसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना एक खास भेट दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 28, 2025 | 05:03 PM
Trump Munir Sharif Meet in white house pakistan shows rare minerals

Trump Munir Sharif Meet in white house pakistan shows rare minerals

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हाइट हाउसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी घेतली ट्रम्पची भेट
  • डोनाल्ड ट्रम्प यांना असीम मुनीर यांनी दिलं खास गिफ्ट
  • क्रिप्टो करन्सीवर बैठकीत झाली चर्चा

Trump-Munir-Sharif Meeting : वॉशिंग्टन : भारतासाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये पा किस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी पाकिस्तानने मोठा डाव साधण्याचा प्रयत्न केला आहे.

या तीन नेत्यांच्या बैठकीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना खास भेट दिली आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोठी खळबळ उडाली आहे. कारण मुनीर या फोटोंमध्ये ट्रम्प यांना मिनरल्सचे नमुने दाखवताना दिसत आहेत.

‘भारतीय उद्योजक PM मोदींवर… ; टॅरिफच्या मुद्यावरुन ट्रम्पच्या सहकार्याचे खळबळजनक विधान

काय आहे याचा हेतू?

या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. या लाकडी पेटीत बॅस्टेझेनाइट, मोनाझाइट, यांसारखी खनिजे आहेत. यामध्ये सेरियम, लॅंथेनम आणि निओजायमियम यांसारख्ये दुर्मिळ घटक आढळतात. या खनिजांचा वापर आधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी निर्मिती आणि संरक्षण उद्योदात मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे तज्ज्ञांनी पाकिस्तानच्या या खास गिफ्टकडे एक धोरणात्मक खेळी म्हणून पाहिले आहे.

विश्लेषकांच्या मते, यातून पाकिस्तान डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीच पाकिस्तानने बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात तेल, वायू, आणि खनिजांचे मोठे साठे असल्याचा दावा केला होता. पण यावर कोणताही ठोस पुरावा आढळला नाही. पण यावेळी पाकिस्तानेने स्वत:ची नैसर्गिक संपत्ती दाखवून अमेरिकेन कंपन्यांसोबत नव्या कराराचे संकेत दिले आहे.

Asim Munir showing rare earth elements of his country to Trump in White House. That’s the reason they are getting all the pampering. The US needs a way around the Chinese supply. pic.twitter.com/vxP4C0bpiy — Shining Star (@ShineHamesha) September 28, 2025

क्रिप्टोकरन्सीवरही चर्चा

या बैठकीदरम्यान क्रिप्टोकरन्सीवरही चर्चा करण्यात आली. पाकिस्तानचे अनऔपचारिक मंत्री क्रिप्टो मंत्री बिलाल बिन साकिब यांनी ट्रम्प यांचे सल्लागार पॅट्रिक विट यांची भेट घेतली. यावेळी अमरिकन आणि पाकिस्तान सहकार्याच्या नव्या संधींबद्दल चर्चा झाली. तसेच दोन्ही देशात क्रिप्टो करन्सीत सहकार्य करण्यावरही चर्चा झाली.

भारतासाठी धोक्याची घंटा?

गेल्या काही काळात भारत आणि अमेरिकेत टॅरिफमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प आणि काही अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे. शिवाय असीम मुनीर यांचीही अमेरिकेला तिसरी भेट आहे. या भेटीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानच्या दिशेने बदलता दृष्टीकोन हा भारतासाठी धोका वाढवणार असल्याचे तज्ज्ञांच्या मत आहे.

UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृ्त्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक

Web Title: Trump munir sharif meet in white house pakistan shows rare minerals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Donald Trump
  • Shahbaz Sharif

संबंधित बातम्या

ट्रम्प यांची मोठी खेळी! पाकिस्तानच्या ‘या’ मित्र देशाला करणार लष्करी मदत; भारताने व्हावे सावध?
1

ट्रम्प यांची मोठी खेळी! पाकिस्तानच्या ‘या’ मित्र देशाला करणार लष्करी मदत; भारताने व्हावे सावध?

नोबेल पुरस्कार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळाला पाहिजे ; ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ
2

नोबेल पुरस्कार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळाला पाहिजे ; ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Gaza War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांनी गाझातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे दिले संकेत; ओलिसांच्या सुटकेचाही केला दावा
3

Gaza War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांनी गाझातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे दिले संकेत; ओलिसांच्या सुटकेचाही केला दावा

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
4

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.