UNGA मध्ये भारताचा डंका! PM मोदींच्या जागतिक नेतृ्त्त्वाचे आंतरराष्ट्रीय देशांकडून कौतुक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India in UNGA : न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेचे ८० वे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे. या अधिवेशनात भारतासह अनेक जागतिक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. या अधिवेनशनात भारताने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे भारताचे जगभर कौतुक केले जात आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील योगदानाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
नुकतेच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान प्रसाद-बिस्सेसर यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो, त्यांनी केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसाठी मोलाचे योगदान दिले आहे. बिस्सेसर यांनी विशेष करुन पंतप्रधान मोदींच्या साऊथ-साऊथ को-ऑपरेशन मधील सहकार्याचे आणि त्याला पुढे नेण्याच्या कामाचे कौतुक केलेय. त्यांनी सांगितले की, यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.
कमला बिस्सेसर यांनी पंतप्रधान मोदींच्या साऊथ-साऊथ सहकार्याचा उल्लेख करताना सांगितले की, आतापर्यंत जागतिक स्तरावर उत्तर देशांचा दबादबा होता. पण आता यात विकसनशील देशांचा आवाज देखील पंतप्रधान मोदींमुळे वाढला आहे. त्यांनी सांगितले की, मोदींनी ब्राझील, घाना, त्रिनिदाद, टोबॅगो यांसारख्या देशांना प्राधान्य दिले. तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधत एकतेचा संदेश दिला.
याच वेळी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, भारताचे जागतिक स्तरावर वाढचे वर्चस्व पाहता, भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र असल्याचे म्हटले. यासाठी भूतानकडून भारताला पाठिंबा दर्शवला. तसेच जागतिक पातळीवर भारताच्या भूमिकेला मान्यता मिळावी अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
या सर्व घडामोडींवरुन लक्षात येते केली भारताचे नेतृत्त्व केवळ स्वत:पुरते मार्यादित राहिलेले नाही. जागतिक दक्षिणेकडील देशांसाठी देखील भारताने आवाज उठवण्यात योगदान दिले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामुळे विकसनशील देशांना एक नवे स्थान मिळत आहे. यामळे भारताचे महत्त्व आणि भूमिका वाढत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताबद्दल काय बोलण्यात आले?
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या वाढत्या वर्चस्वाचे आणि नेतृत्त्वाचे कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करण्यात आले. तसेच संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरुपी स्थान देण्याची मागणी झाली.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भारताबद्दल काय म्हटले?
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भारताचे साऊथ-साऊथ विकसनशील देशांसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले.
भूतानच्या पंतप्रधानांनी भारताबद्दल काय भूमिका घेतली?
भूतानच्या पंतप्रधानांनी भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र असल्याचे म्हटले. यासाठी भूतानकडून भारताला पाठिंबा दर्शवला.